IPL Auction 2025 Updates: आयपीएल २०२४ च्या मेगा लिलावाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये एकूण १५७४ खेळाडूंनी आपली नाव नोंदवली आहे. पण आश्चर्याची बाब म्हणजे आयपीएलमध्ये निवृत्ती घेतलेल्या ४२ वर्षीय खेळाडूने आपलं नाव नोंदवलं आहे. BCCI ने ५ नोव्हेंबर रोजी IPL 2025 च्या मेगा लिलावाबाबत मोठी घोषणा केली. १८व्या हंगामापूर्वी २४ आणि २५ नोव्हेंबर रोजी जेद्दाह, सौदी अरेबिया येथे आयपीएल २०२५ चा मेगा लिलाव आयोजित केला जाईल असे सांगण्यात आले. सलग दुसऱ्या वर्षी आयपीएलचा लिलाव परदेशात होणार आहे.

IPL मेगा लिलावासाठी ११६५ भारतीय खेळाडूंसह एकूण १५७४ क्रिकेटपटूंनी आपली नावे नोंदवली आहेत. यामध्ये ३२० कॅप्ड आणि १२२४ अनकॅप्ड खेळाडू आणि सहयोगी देशांतील ३० खेळाडूंचा समावेश आहे. या आकडेवारीवरून जगभरात आयपीएलची किती क्रेझ आहे, याचा अंदाज येऊ शकतो. सर्वात चकित करणारी गोष्ट म्हणजे या लिलावासाठी एका दिग्गज गोलंदाजानेही आपले नाव दिले आहे, तो ४२ वर्षांचा असून त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे.

Ashish Shelar Raj Thackeray
Ashish Shelar : अमित ठाकरेंनंतर भाजपाचा मनसेच्या आणखी एका उमेदवाराला पाठिंबा, कंबर कसून प्रचार करण्याचे आदेश
Vinayak Chaturthi special 5th November Rashi Bhavishya
५ नोव्हेंबर पंचांग: विनायक चतुर्थीला ‘या’ राशींना होणार…
Bullet Train Bridge Collapse in Anand Gujarat
Bullet Train Bridge Collapse : बुलेट ट्रेन प्रकल्पाचा पूल कोसळला, तीन मजूर ठार; ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकले, बचावकार्य जारी
US Presidential Election Results 2024 Live Updates in Marathi| Donald Trump vs Kamala Harris Live
US Election Results 2024 Live Updates: कमला हॅरीस यांना अमेरिकन महिलांची ५४ टक्के मतं; वाचा कुणाला कुणाची किती मतं मिळाली!
Australian fast bowler Josh Hazlewood statement about the Indian team sport news
दमदार पुनरागमनाची भारतात क्षमता! कमी लेखण्याची चूक करणार नाही; ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज हेझलवूडचे वक्तव्य
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Maharashtra Assembly Election 2024 _ BJP
Assembly Election: भाजपाने अखेर बंडखोरांना हिसका दाखवला; ४० नेत्यांवर उगारला कारवाईचा बडगा
devendra fadnavis on amit thackeray
अमित ठाकरेंच्या उमेदवारीवर देवेंद्र फडणवीस म्हणतात, “राज ठाकरेंनी या एका जागेवर…”

हेही वाचा – IPL Auction Date: आयपीएल लिलावाची तारीख जाहीर, १ नव्हे दोन दिवस चालणार महालिलाव; १४७५ खेळाडूंचा समावेश

आयपीएल लिलावात उतरणारा ४२ वर्षीय खेळाडू आहे तरी कोण?

हा ४२ वर्षीय दुसरा कोणी नसून इंग्लंडचा उत्कृष्ट वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन आहे. जेम्स अँडरसनने आंतरराष्ट्रीय क्रिकेट ९९१ विकेट घेतले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये ७०० हून अधिक विकेट घेणाऱ्या अँडरसनने यावर्षी जुलैमध्ये क्रिकेटला अलविदा केला. निवृत्तीची घोषणा केल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच अँडरसनने टी-२० क्रिकेटमध्ये खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. तो म्हणाला होता की मला अजूनही क्रिकेट खेळायचे आहे आणि टी-२० क्रिकेटमध्ये मी खेळण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याला फ्रँचायझी क्रिकेटचा आनंद घ्यायचा आहे, असे तो म्हणाला होता. पण तो आयपीएलच्या मेगा लिलावात उतरेल अशी कोणालाच अपेक्षा नव्हती.

हेही वाचा – IPL 2025 Retention: रिटेंशननंतर कोणत्या संघाकडे किती रक्कम शिल्लक? या संघाच्या खात्यात तर तब्बल ११० कोटी

जेम्स अँडरसनने मेगा लिलावासाठी त्याची मूळ किंमत १.२५ कोटी रुपये ठेवली आहे. अँडरसनने १५ वर्षांपूर्वी २००९ मध्ये इंग्लंडसाठी शेवटचा टी-२० सामना खेळला होता, तर टी-२० क्रिकेटमधील त्याने शेवटचा सामना २०१४ मध्ये खेळला होता. आता आयपीएल लिलावात कोणता संघ त्याच्यावर बोली लावणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

हेही वाचा – Virat Kohli Birthday: विराट, वामिका, अकाय…; अनुष्का शर्माने पहिल्यांदाच शेअर केला दोन्ही मुलांबरोबरचा फोटो, कोहलीच्या वाढदिवशी खास पोस्ट

लिलावासाठी साइन अप केलेल्या इंग्लंडच्या इतर ५२ खेळाडूंपैकी अँडरसनबरोबर वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर असेल, जो दुखापतीतून परतल्यानंतर लिलावात उतरणार आहे. इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्सने यंदाच्या लिलावातून आपले नाव मागे घेतले आहे. आयपीएलचा नवीन नियम लागू झाल्यामुळे, स्टोक्सने मेगा लिलावासाठी नाव न नोंदवल्यामुळे आयपीएल २०२६ च्या लिलावात त्याचे नाव नोंदणी करण्यास पात्र राहणार नाही. १० पैकी एकाही फ्रँचायझीने कोणत्याच इंग्लिश खेळाडूला रिटेन केलेले नाही.