IPL Auction 2025 Retained Players List Deadline: IPL च्या गव्हर्निंग काऊन्सिलने शनिवारी रात्री IPL 2025 च्या मेगा लिलावासाठी लिलावाबाबत काही नियमांची घोषणा केली आहे. यामध्ये संघांना जास्तीत जास्त सहा खेळाडू रिटेन करण्याची किंवा राईट टू मॅच (RTM) कार्ड पर्याय वापरून संघात ठेवण्याची परवानगी असेल. यासह रिटेन खेळाडूंची यादी जाहीर करण्याची तारीख बीसीसीआयने निश्चित केली असल्याची माहिती समोर आली आहे. पण याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
BCCI ने ३१ ऑक्टोबर २०२४ ही सर्व १० फ्रँचायझींना त्यांच्या कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी मेगा लिलावापूर्वी जाहीर करण्याची अंतिम मुदत ठेवली आहे. या तारखेपूर्वी संघांना त्यांच्या सर्व कायम ठेवलेल्या खेळाडूंची नावे जाहीर करावी लागतील, असे क्रिकबझने दिलेल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. बीसीसीआयकडून या तारखेची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.
क्रिकबझच्या वृत्तानुसार, बीसीसीआयने असेही म्हटले आहे की जे खेळाडू ३१ ऑक्टोबर किंवा त्यापूर्वी आंतरराष्ट्रीय पदार्पण करतील त्यांना लिलावात कॅप्ड खेळाडू मानले जाईल. आयपीएलने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की हे रिटेंशन नियमाच्या फायद्यासाठी, ३१ ऑक्टोबर २०२४ रोजी किंवा त्यापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा कोणताही खेळाडू कॅप्ड खेळाडू म्हणून गणला जाईल.
रिटेंशन आणि आरटीएमसाठी खेळाडूंची निवड करण्याचा निर्णय फ्रँचायझीवर सोडला आहे. सहा रिटेंशन/RTM मध्ये पाच कॅप्ड आणि दोन अनकॅप्ड खेळाडू असू शकतात. याव्यतिरिक्त, प्रत्येक संघासाठी लिलाव पर्स देखील १२० कोटी रुपये करण्यात आली आहे. एका ऐतिहासिक निर्णयात, आयपीएलने असेही म्हटले आहे की प्लेइंग इलेव्हन आणि इम्पॅक्ट प्लेअरला प्रति सामना ७.०५ लाख रुपये मॅच फी मिळेल, याला बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनीही पुष्टी दिली आहे.