IPL Auction 2025 Updates in Marathi: आयपीएल २०२५ च्या लिलावाची तारीख जाहीर करताना आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलने कोणत्या देशातील किती खेळाडूंनी लिलावासाठी आपली नावं नोंदवली आहेत, हे देखील आकडेवारीसहित सांगितले. या यादीत एका नव्या देशातील खेळाडूने प्रथमच आयपीएल लिलावासाठी आपले नाव नोंदवले आहे. या खेळाडूचे आयपीएलमधील यशस्वी आणि प्रसिद्ध संघ मुंबई इंडियन्सशी कनेक्शन आहे. यावेळी भारतीय आणि विदेशी खेळाडूंसह एकूण १५७४ खेळाडूंनी आयपीएल लिलावासाठी आपली नावे नोंदवली आहेत. या आकडेवारीसह एक नाही तर दोन दिवस महालिलाव चालणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आयपीएल २०२५ च्या महालिलावासाठी इटलीच्या खेळाडूने आपलं नाव नोंदवली आहेत. इटलीचा वेगवान गोलंदाज थॉमस जॅका ड्रेकाने आयपीएल लिलावात सहभागी होण्यासाठी आपले नाव नोंदवले आहे. ईएसपीएन क्रिकइन्फोच्या रिपोर्टनुसार, २४ वर्षीय थॉमस जॅका ड्रेकाने यावर्षी इटली संघाकडून टी-२० आंतरराष्ट्रीय पदार्पण केले आहे, ज्यामध्ये त्याने आतापर्यंत ४ सामन्यात खेळताना ८ विकेट घेतल्या आहेत.

हेही वाचा – IPL Auction 2025: आयपीएल लिलावात दिसणार ४२ वर्षीय खेळाडू, १५ वर्षांपूर्वी खेळला होता अखेरचा टी-२० सामना; ‘या’ संघाचा आहे गोलंदाजी कोच

कोण आहे थॉमस जॅक ड्रेका? (Who is Thomas Jack Draca?)

थॉमस जॅक ड्रेका याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले असताना, त्याच्याकडे टी-२० फ्रँचायझी लीगमध्ये खेळण्याचा अनुभव देखील आहे, ज्यामध्ये तो कॅनडामध्ये खेळल्या गेलेल्या ग्लोबल टी-२० लीगमध्ये ब्रॅम्प्टन वुल्व्ह्सचा भाग होता आणि या मोसमात त्याने ६ सामने खेळताना ११ विकेट्स घेतल्या. याशिवाय, थॉमस जॅक ड्रेक आगामी आंतरराष्ट्रीय टी-२० लीगमध्ये एमआय एमिरेट्स संघाचा एक भाग आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्स मेगा लिलावात या खेळाडूवर बोली लावण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – IPL Auction Date: आयपीएल लिलावाची तारीख जाहीर, १ नव्हे दोन दिवस चालणार महालिलाव; १४७५ खेळाडूंचा समावेश

मुंबई इंडियन्स संघाने रिटेन केलेले खेळाडू

मुंबई इंडियन्सने IPL 2025 साठी संघातील मुख्य आणि ५ भारतीय कॅप्ड खेळाडूंना रिटेन केले आहे. यामध्ये संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा, हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांना कायम ठेवले आहे. ज्यामध्ये बुमराहला सर्वाधिक किंमतीत कायम ठेवण्यात आले आहे. बुमराहला मुंबई इंडियन्सने १८ कोटींमध्ये कायम ठेवले आहे.

हेही वाचा – IPL 2025 Retention: रिटेंशननंतर कोणत्या संघाकडे किती रक्कम शिल्लक? या संघाच्या खात्यात तर तब्बल ११० कोटी

सर्व १० आयपीएल फ्रँचायझींनी ३१ ऑक्टोबरला रिटेन केलेल्या खेळाडूंची नावे जाहीर केली होती. त्यानंतर आता लिलावात एकूण २०४ खेळाडूंचे स्लॉट रिक्त आहेत, ज्यामध्ये प्रत्येक संघ एकूण २५ खेळाडूंचा संघ बनवू शकतो.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl auction 2025 italian player thomans jack draca registered first time for mega auction who represented mumbai indians team in ilt20 bdg