BCCI likely to allow 5 retentions In IPL 2025 Auction: आयपीएल २०२५ला सुरूवात होण्यापूर्वी यंदा मोठा लिलाव होणार आहे. येत्या काही महिन्यांत हा लिलाव होण्याची शक्यता आहे. तत्त्पूर्वी संघांना कायम ठेवलेल्या आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करायची आहे. पण बीसीसीआय संघात कायम ठेवल्या जाणाऱ्या खेळाडूंबद्दल मोठा निर्णय घेणार आहे. आतापर्यंत प्रत्येक संघाला लिलावापूर्वी तीन खेळाडू ठेवण्याची परवानगी होती, परंतु आता ही संख्या तीन ते पाच असू शकते. या नियमाची अंमलबजावणी म्हणजे मुंबई इंडियन्सची मोठी डोकेदुखी संपणार आहे.

आयपीएल संघांना पाच खेळाडू रिटेन करता येणार?

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आयपीएल फ्रँचायझीला पाच खेळाडूंना कायम ठेवण्याची परवानगी देण्याची शक्यता आहे. मुंबई इंडियन्ससाठी पाच खेळाडूंना संघात कायम ठेवण्याचा निर्णय खूप मोठा ठरू शकतो. कारण, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्या या खेळाडूंना संघात कायम ठेवता येईल. जे मुंबई इंडियन्स संघाचा भक्कम आधार राहिले आहेत.

हेही वाचा – Vinesh Phogat: विनेश फोगटला ‘NADA’ने बजावली नोटीस, १४ दिवसांत मागितले उत्तर; काय आहे संपूर्ण प्रकरण?

BCCI च्या मुख्यालयात नुकत्याच झालेल्या बैठकीत सर्व १० संघ मालकांशी खेळाडू रिटेनरशिपबद्दल चर्चा केली आणि त्यांच्यापैकी बहुतेक संघ मालकांना ५ ते ६ खेळाडूंना कायम ठेवण्याची इच्छा व्यक्त केली. वृत्तानुसार, फ्रँचायझी मालकांच्या विनंतीनंतर बीसीसीआयने हे मान्य केले आहे, असे केल्याने संघांची ब्रँड व्हॅल्यू कायम राहील, असे मंडळाला वाटते.

२०२२ च्या हंगामापूर्वी, जेव्हा फ्रँचायझींना जास्तीत जास्त चार खेळाडू ठेवण्याची परवानगी होती, तेव्हा तीनपेक्षा जास्त भारतीय आणि दोन परदेशी खेळाडूंना कायम ठेवू नये अशी अट होती. प्रत्येक फ्रँचायझीने किती परदेशी खेळाडूंना कायम ठेवता येईल याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती दिलेली नाही.

हेही वाचा – ICC कसोटी क्रमवारीत विराट-रोहितला मोठा फटका! यशस्वी टॉप-५ मध्ये दाखल तर ऋषभचे दमदार पुनरागमन

पाच खेळाडूंना कायम ठेवण्याची शक्यता असल्याने सर्वांच्या नजरा आता मुंबई इंडियन्सवर असणार आहेत. गेल्या दशकभरात मुंबई संघाचा पाया असलेले खेळाडू संघात कायम राहू शकतात. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली २०२४ मधील अत्यंत खराब हंगामानंतर संघ कोणत्या खेळाडूंना कायम ठेवतो, हे पाहणे मनोरंजक असेल.

२०२२मध्ये, जेव्हा मुंबईने चार खेळाडूंना रिटेन केले, तेव्हा रोहितला सर्वाधिक १६ कोटी रुपये रक्कम मिळाली, त्यानंतर बुमराह (रु. १२ कोटी), सूर्यकुमार यादव (८ कोटी) आणि कायरन पोलार्ड (६ कोटी रुपये) ही नावे होती. या वेळी, बुमराह आणि सूर्यकुमार यांची खेळाडू म्हणून किंमत वाढल्याने, इतर खेळाडूंशी करार केल्यानंतर या खेळाडूंना कोणत्या किंमतीसह संघात कायम ठेवले जाते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

हेही वाचा – VIDEO : अश्विनने भारताच्या क्षेत्ररक्षण प्रशिक्षकांबद्दल सांगितला मजेशीर किस्सा; म्हणाला, ‘इंटरनेटवर जेव्हा त्यांचे नाव सर्च केले…’

बीसीसीआयने किती खेळाडू संघात कायम ठेवायचे याचा निर्णय अद्याप दिलेला नाही. पण यंदाचा लिलाव हा मेगालिलाव असणार आहे. आयपीएल बैठकीदरम्यान, सुरुवातीपासूनच या स्पर्धेचा भाग असलेल्या बहुतेक फ्रँचायझींना चार किंवा पाच वर्षांच्या कालावधीत एकदा मोठे लिलाव व्हावे, अशी इच्छा आहे. संघातील सातत्य आणि प्रतिभावान खेळाडूंना तयार करण्यात घेतलेली मेहनत हे मुद्दे लक्षात घेता आयपीएल २०२५ साठी लिलाव न होता पुढील वर्षी व्हावा अशी संघमालकांची इच्छा होती. २०२५ पूर्वी २०२२ आणि २०१८ मध्ये मोठे लिलाव झाले होते.

कोलकाता नाइट रायडर्सचा सह-मालक शाहरुख खान या वर्षीचा मेगा लिलाव होऊ नये, असे त्याचे मत होते. तर केकेआर व्यतिरिक्त, मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्ज, सनरायझर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स देखील मेगा लिलाव पुढे ढकलण्यासाठी सहमत होते.