इंडियन प्रिमियर लीग म्हणजेच आयपीएलच्या १४ व्या पर्वातील खेळाडूंचा लिलाव आज पार पडत आहे. या लिलावामध्ये पहिल्या फेरीत चेन्नई सुपरकिंग्जकडून खेळणाऱ्या केदार जाधवला कोणत्याही संघाने विकत घेतलेलं नाही. केदार जाधवचा समावेश अनसोल्ड प्लेयर्सच्या म्हणजेच लिलावामध्ये कोणीही बोली न लावलेल्या खेळाडूंच्या यादीत झाला आहे.
नुकत्याच पार पडलेल्या आयपीच्या तेराव्या हंगामात सर्वात आधी प्लेऑफ्समधून बाहेर पडलेल्या चेन्नईच्या संघाने काही सामने अगदी थोड्या फरकाने गमावले. यापैकी काही सामन्यांमधील पराभव हा केदारच्या संथ खेळीमुळे झाल्याने तो चर्चेचा विषय ठरला होता. चेन्नईच्या सामान्यांनंतर सोशल नेटवर्किंग साईटवर केदारसंदर्भातील चर्चा आवर्जून पहायला मिळायची. टी-२० सारख्या जलद फॉरमॅटमध्ये अशाप्रकारचा संथपणा चेन्नईसारख्या टीममधील खेळाडूने दाखवणे योग्य नसल्याची टीकाही त्याच्या खेळासंदर्भात करण्यात आली. मागील हंगामातील याच टीकेचा परिणाम आजच्या लिलावामध्ये पाहायला मिळाला.
Kedar Jadhav is up next & he goes UNSOLD @Vivo_India #IPLAuction
— IndianPremierLeague (@IPL) February 18, 2021
आयपीएलच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवर केदार अनसोल्ड खेळाडू ठरल्याचं ट्विट करण्यात आल्यानंतर चेन्नईच्या चाहत्यांनीच त्याच्यावर आपल्या संघाने बोली न लावल्याबद्दल आनंद व्यक्त केलाय.
१) देवाचे आभार
Thank the almighty!
— Balaji (@Bala_h16) February 18, 2021
२) होणारचं होतं हे
— કાઠિયાવાડી (@TheHukum) February 18, 2021
३) २०२१ बरं दिसत आहे
2021 has been good. Thank god
— CSK (@CSKFan999) February 18, 2021
४) २० लाखाची वस्तू दोन कोटींना विकण्याचा प्रयत्न करतो तेव्हा…
This is what happens when 20 lakh material, sets his price as 2 cr
— Paritosh Singh (@papakapari) February 18, 2021
५) कोणीच विकत घेऊ नका
good job and make sure no one purchase him at end
— Team Baan (@mdanish9807) February 18, 2021
६) अपेक्षित होतं हे
As expected
— Vamsidhar (@Vamsidhar1835) February 18, 2021
७) चेन्नई तुम्ही काय करत होता?
@ChennaiIPL what where you guys doing?
— Adarsh Mkv (@AdarshMkv) February 18, 2021
८) बेस प्राइज कमी ठेवायची ना
Hahahahah fav of csk, goes unsold he should have kept his base price under 1c
— Fahad (@FahadAzeem07) February 18, 2021
९) सीएसकेचे चाहते हे पाहून
CSK Fans to CSK for not bidding on Kedar Jadhav , but still doubt somehow CSK managament will get him into CSK and also into playing XI pic.twitter.com/ncHNm6Ec9p
— P Deepak (@p_deepak28) February 18, 2021
१०) चेन्नईला सुनावलं
@ChennaiIPL you’ll regret not taking @JadhavKedar
— Anonymously (@Krishna_TSK) February 18, 2021
केदारची बेस प्राइज म्हणजेच किमान किंमत दोन कोटी रुपये ठेवण्यात आली होती.