इंडियन प्रिमियर लीग म्हणजेच आयपीएलच्या १४ व्या पर्वातील खेळाडूंचा लिलाव आज पार पडत आहे. या लिलावामध्ये पहिल्या फेरीत चेन्नई सुपरकिंग्जकडून खेळणाऱ्या केदार जाधवला कोणत्याही संघाने विकत घेतलेलं नाही. केदार जाधवचा समावेश अनसोल्ड प्लेयर्सच्या म्हणजेच लिलावामध्ये कोणीही बोली न लावलेल्या खेळाडूंच्या यादीत झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नुकत्याच पार पडलेल्या आयपीच्या तेराव्या हंगामात सर्वात आधी प्लेऑफ्समधून बाहेर पडलेल्या चेन्नईच्या संघाने काही सामने अगदी थोड्या फरकाने गमावले. यापैकी काही सामन्यांमधील पराभव हा केदारच्या संथ खेळीमुळे झाल्याने तो चर्चेचा विषय ठरला होता. चेन्नईच्या सामान्यांनंतर सोशल नेटवर्किंग साईटवर केदारसंदर्भातील चर्चा आवर्जून पहायला मिळायची. टी-२० सारख्या जलद फॉरमॅटमध्ये अशाप्रकारचा संथपणा चेन्नईसारख्या टीममधील खेळाडूने दाखवणे योग्य नसल्याची टीकाही त्याच्या खेळासंदर्भात करण्यात आली. मागील हंगामातील याच टीकेचा परिणाम आजच्या लिलावामध्ये पाहायला मिळाला.

आयपीएलच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवर केदार अनसोल्ड खेळाडू ठरल्याचं ट्विट करण्यात आल्यानंतर चेन्नईच्या चाहत्यांनीच त्याच्यावर आपल्या संघाने बोली न लावल्याबद्दल आनंद व्यक्त केलाय.

१) देवाचे आभार

२) होणारचं होतं हे

३) २०२१ बरं दिसत आहे

४) २० लाखाची वस्तू दोन कोटींना विकण्याचा प्रयत्न करतो तेव्हा…

५) कोणीच विकत घेऊ नका

६) अपेक्षित होतं हे

७) चेन्नई तुम्ही काय करत होता?

८) बेस प्राइज कमी ठेवायची ना

९) सीएसकेचे चाहते हे पाहून

१०) चेन्नईला सुनावलं

केदारची बेस प्राइज म्हणजेच किमान किंमत दोन कोटी रुपये ठेवण्यात आली होती.

मराठीतील सर्व आयपीएल २०२१ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl auction kedar jadhav goes unsold scsg
Show comments