प्रत्येक संघाला पाच खेळाडू राखून ठेवता येणार
आयपीएल २०१४ साठीचा खेळाडूंचा लिलाव १२ फेब्रुवारी रोजी होणार असून यावेळी संघमालकांना आपल्या संघातील एकूण पाच खेळाडूंना राखून ठेवता येणार आहे.
संघातील खेळाडू राखीव ठेवण्याच्या मुद्द्यावर आयपीएलच्या शिष्टमंडळाने चर्चा केल्यानंतर संघ रचना, खेळाडूंचे करार आणि लिलावाआधी संघातील खेळाडू राखून ठेवण्याच्या नियमांमध्ये बदल केले आहेत.
आगामी पेप्सी आयपीएल २०१४ साठीचा खेळाडूंचा लिलाव १२ फेब्रुवारीला होणार असून गरज भासल्यास पुढचा एक दिवस म्हणजेच १३ फेब्रुवारी लिलावासाठी राखून ठेवण्यात आलेला आहे. असे बीसीसीआयने दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
नव्या नियमांनुसार, प्रत्येक संघातील पाच खेळाडू राखीव ठेवता येणार आहेत म्हणजेच त्यांचा लिलावात समावेश होणार नाही. मात्र, त्यासाठी या पाच राखीव खेळाडूंपैकी प्रत्येक खेळाडूमागे अनुक्रमे १२.५ कोटी, ९.५ कोटी, ७.५ कोटी, ५.५ कोटी आणि ४ कोटी इतकी रक्कम प्रत्येक संघाला राखावी लागणार आहे. तर संघातील उर्वरित सर्व खेळाडूंचा लिलावात समावेश होणार आहे.
‘आयपीएल’ २०१४ साठीच्या खेळाडूंचा लिलाव १२ फेब्रुवारी रोजी
प्रत्येक संघाला पाच खेळाडू राखून ठेवता येणार आयपीएल २०१४ साठीचा खेळाडूंचा लिलाव १२ फेब्रुवारी रोजी होणार असून यावेळी संघमालकांना आपल्या संघातील एकूण पाच खेळाडूंना राखून ठेवता येणार आहे.
First published on: 24-12-2013 at 06:21 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl auctions on february 12 franchises can retain maximum 5 players