आयपीएल सट्टेबाजीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांचे जावई गुरुनाथ मयप्पन याचा सट्टेबाजीत हात असल्याचा अहवाल दिला आहे. संघातील गोपनीय माहिती सट्टेबाजांना पुरवण्यातही त्याची मोलाची भूमिका होती, असा ठपकाही समितीने ठेवला आहे.
आयपीएल स्पॉट-फिक्सिंगचे प्रकरण काही दिवस शांत वाटत असले, तरी ही वादळापूर्वीची शांतता असल्याचे आता दिसून येत आहे. एकीकडे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कार्याध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांची मान अभिमानाने ताठ झाली होती, पण जावई गुरुनाथ मयप्पन याच्या कृष्णकृत्यांमुळे त्यांच्यावर मान शरमेने खाली घालण्याची वेळ आली आहे. श्रीनिवासन यांच्या आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्ज या संघातील मयप्पनचा सहभाग यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. यासाठी सर्वोच्च न्यायालयाने ही समिती नेमली होती.  
‘राजस्थान रॉयल्स’चे मालक राज कुंद्रा आणि त्यांची अभिनेत्री पत्नी शिल्पा शेट्टी यांच्या सट्टेबाजीतील सहभागाबाबतच्या आरोपांची आणखी चौकशी करण्याची गरज असल्याचे समितीने आपल्या अहवालात म्हटले आहे. याशिवाय चौकशीत संशयित म्हणून ज्यांची नावे पुढे आली आहेत. त्यांची नावे समितीने मोहोरबंद पाकिटात न्यायालयासमोर सादर केली.
सचिन, द्रविडसारख्या खेळाडूंच्या मार्गदर्शनाची सूचना
क्रिकेटमधील या गैरप्रकारांना आळा घालण्याच्या दृष्टीने समितीने काही शिफारशीही केल्या आहेत. सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सौरव गांगुल, व्ही. व्ही. एस. लक्ष्मण, व्यंकटेश प्रसाद, अनिल कुंबळे सारखे दिग्गज आयपीएलच्या विविध संघातील विशेषकरून नव्या खेळाडूंना या प्रकारांपासून दूर ठेवण्याबाबत मार्गदर्शन करू शकतात, असे न्यायालयाने म्हटले आहे.
आयपीएलचा लिलाव  ठरल्याप्रमाणे -शुक्ला
सर्वोच्च न्यायालयाच्या समितीच्या निष्कर्षांचा परिणाम बंगळुरू येथे होणाऱ्या आयपीएलच्या सातव्या हंगामाच्या लिलावावर होणार नाही, असेबीसीसीआयचे उपाध्यक्ष आणि आयपीएलचे माजी अध्यक्ष राजीव शुक्ला यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चेन्नई सुपर किंग्जचा  करार रद्द होणार?
‘फ्रँचायजीस’च्या करारातील तरतुदींनुसार कोणतीही फ्रँचायजी, फ्रँचायजी समूह किंवा फ्रँचायजीचा मालक यांच्यामुळे जर आयपीएल, बीसीसीआय आणि क्रिकेटसारख्या खेळाच्या प्रतिष्ठेवर विपरीत परिणाम होत असेल तर त्यांचा करार रद्द केला जातो. या पाश्र्वभूमीवर बीसीसीआय चेन्नई संघाच्या भवितव्याबाबत काय निर्णय घेईल, हेही लवकरच स्पष्ट होईल.

भारतीय खेळाडूंवरही संशय
सर्वोच्च न्यायालयाच्या समितीच्या अहवालानुसार भारताचे प्रतिनिधित्व केलेल्या सहा खेळाडूंवर सामना निश्चितीमध्ये सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या अहवालात या खेळाडूंची नावे असल्याचे म्हटले जात आहे.

मुंबई पोलिसांवर ताशेरे
मुंबई पोलिसांवरही या सर्वोच्च न्यायालयाच्या समितीने ताशेरे ओढले आहेत. दाऊदच्या कथित सहभागाप्रकरणी तपास करण्यास असमर्थता दाखवल्याबद्दल मुंबई पोलिसांवर सुप्रीम कोर्टाच्या आयपीएल फिक्सिंग चौकशी समितीने ताशेरे ओढले आहेत. त्याचबरोबर पाकिस्तानी पंच असद रौफ यांच्याविरुद्ध पुरावे असूनही याबाबत कोणताही कारवाई न केल्याप्रकरणी मुंबई पोलीसांची कान उघडणीही करण्यात आली आहे.

श्रीनिवासन यांचा पाय खोलात
एन. श्रीनिवासन यांची आंतराराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या कार्याध्यक्षपदी निवड झाली खरी. मात्र  त्यांचा जावई मयप्पन याचा ‘आयपीएल’ सट्टेबाजीत सहभाग असल्याचा निष्कर्ष निधाल्याने श्रीनिवासन पुन्हा अडचणीत आले आहेत.

फिक्सिंगचा ‘स्पॉट’ तरीही ट्वेन्टी-२०ची लाट
चेन्नई संघाची सूत्रे मयप्पनकडे होती
मयप्पनला आमच्याकडून क्लीन चीट नाही- गुन्हे शाखा