आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठीच्या लिलावात दिल्ली कॅपिटल्सने काही धाडसी निर्णय घेतलेले पहायला मिळाले. शेमरॉन हेटमायर आणि मार्कस स्टॉयनिस यासारख्या प्रमुख खेळाडूंवर दिल्लीने बोली लावत त्यांना संघात दाखल करुन घेतलं. तर ऑस्ट्रेलियन यष्टीरक्षक केरी, जेसन रॉय आणि अष्टपैलू ख्रिस वोक्स यांनाही दिल्लीच्या संघात स्थान मिळालं आहे. जाणून घेऊयात दिल्लीचा संपूर्ण संघ…

फलंदाज – श्रेयस अय्यर, पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे, शिखर धवन, जेसन रॉय (१ कोटी ५० लाख)

गोलंदाज – इशांत शर्मा, अमित मिश्रा, आवेश खान, संदीप लामिच्छाने, कगिसो रबाडा, किमो पॉल, मोहीत शर्मा (५० लाख), ललित यादव (२० लाख)

अष्टपैलू – अक्षर पटेल, हर्षल पटेल, रविचंद्रन आश्विन, मार्कस स्टॉयनिस (४ कोटी ८० लाख), ख्रिस वोक्स (१ कोटी ५० लाख)

यष्टीरक्षक – ऋषभ पंत, अ‍ॅलेक्स केरी (२ कोटी ४० लाख), शेमरॉन हेटमायर ( ७ कोटी ७५ लाख)

 

दरम्यान, पहिल्या टप्प्यात बोली लागलेल्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे खेळाडू मालामाल झाले. पॅट कमिन्स आणि ग्लेन मॅक्सवेल या दोघांना १० कोटींहून अधिकची बोली लागली. लिलावाच्या दुसऱ्या टप्प्यात अनेक खेळाडू UNSOLD राहिले. कागदावर महत्त्वाच्या वाटणाऱ्या काही खेळाडूंवर कोणीही बोली लावली नाही. आश्चर्याची बाब म्हणजे फिरकीपटू पियुष चावलाला अनपेक्षित बोली लागली. त्याला चेन्नईच्या संघाने विकत घेतले. तिसऱ्या टप्प्यात भारतीय युवा खेळाडूंचा भरणा असला, तरी त्यांच्यावर बोली लावण्यात संघांनी फारसा रस दाखवला नाही. चौथ्या टप्प्यात धक्कादायकरित्या अनेक मोठ्या आणि नावाजलेल्या खेळाडूंना कोणीही वाली मिळाला नाही. मार्टिन गप्टिल, कार्लोस ब्रेथवेट, मुस्तफिजूर रहमान, बेन कटिंग यासारख्या अनेक खेळाडूंना खरेदी करण्यात कोणत्याही संघमालकाने रस दाखवला नाही. तर शेवटच्या टप्प्यात ताज्या यादीतील काही खेळाडूंसह पहिल्या फेरीत UNSOLD राहिलेल्या खेळाडूंनाही पुन्हा लिलावासाठी ठेवण्यात आले. त्यात काही खेळाडूंवर बोली लावण्यात आली.

अवश्य वाचा – IPL 2020 : जाणून घ्या लिलावानंतर मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ