स्पॉट फिक्सिंग प्रकरणी अटक करण्यात आलेले गुरुनाथ मयप्पन हे चेन्नई सुपर किंग्जचे संचालक असल्यामुळे आयपीएलमधून चेन्नईचा संघ बाद होण्याचा धोका होता. पण, आयपीएलचा अंतिम सामना वेळेतच खेळविला जाईल आणि अंतिम सामना होईपर्यंत तरी चेन्नई सुपर किंग्ज संघावर कोणतेही संकट नसल्याचे बीसीसीआयने म्हटले आहे.
आयपीएल कोड ऑफ कंडक्टच्या नियमांनुसार संघाच्या संचालकांपैकी कोणीही फिक्सिंग प्रकरणात दोषी आढळ्यास संघ स्पर्धेतून बाद होऊ शकतो, परंतु गुरूनाथ मयप्पन यांच्यावरील आरोप अजून न्यायालयात सिद्ध झाले नसल्याने स्पर्धेतून चेन्नई संघ बाद होण्याचा धोका टळला आहे. सध्या गुरूनाथ मयप्पन यांची मुंबई पोलिसांमार्फत चौकशी सुरू आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा