इंडियन प्रीमिअर लीगमध्ये (आयपीएल) उठलेल्या वादळामुळे चॅम्पियन्स लीग गुंडाळण्याचा निर्णय घेण्यात आल्याच्या तर्कावर भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी नाराजी व्यक्त करत आयपीएलच्या बचावासाठी पुढाकार घेतला. चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या आयपीएलमधील संघांवर निलंबनाची कारवाई झाल्यानंतर २४ तासांच्या आत चॅम्पियन्स लीग गुंडाळण्यात आली. ‘‘ या दोन्ही घटनांमध्ये कोणताच संबंध नाही. या वेगवेगळ्या स्पर्धा आहेत आणि चॅम्पियन्स लीगमध्ये आयपीएलचे चार संघ खेळतात, तीन संघांना थेट प्रवेश, तर चौथा संघ पात्रता फेरीतून येतो. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेतील प्रत्येकी दोन संघही सहभागी होतात. त्यामुळे आयपीएलचा चॅम्पियन्स लीगवर परिणाम होत असेल, असे वाटत नाही, असे गावसकर म्हणाले.

Story img Loader