आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या दडपणापासून दूर होत मनमोकळेपणाने क्रिकेटचा आनंद लुटण्याची संधी आयपीएलच्या माध्यमातून मिळते. जेवढा आम्ही खेळाचा आनंद घेऊ, तेवढीच आयपीएलमधील आमची कामगिरी चांगली असेल. स्पर्धेदरम्यानच्या मोकळ्या आणि खेळासाठी पोषक वातावरणाचा आम्ही नक्कीच लाभ उठवू. यंदा आम्ही आणखी चांगल्या खेळाडूंना संघात सामील करून घेतले आहे. आमचा संघ समतोल असून जेतेपदासाठी आम्ही कसून मेहनत करत आहोत,’’ असे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा कर्णधार विराट कोहलीने सांगितले.
आणखी वाचा