आयपीएल स्पर्धा म्हटलं की गोलंदाजांची धुलाई होत असल्याचं चित्र समोर येतं. २० षटकांच्या खेळात फलंदाजांना समोर कुणीही गोलंदाज असो चेंडू सीमेपलीकडे न्यायाचं इतकं भान असतं. आक्रमक फलंदाजीमुळे गोलंदाज अक्षरश: रडकुंडीला येतात. आयपीएलच्या कारकिर्दीत भारताच्या चार गोलंदाजांची सर्वाधिक धुलाई झाली आहे. बेसिल थंपी, इशांत शर्मा उमेश यादव आणि संदीप शर्मा या गोलंदाजांनी सर्वाधिक धावा दिल्या आहेत.
आयपीएल २०१८ मध्ये सनराइजर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज बेसिल थंपी याने सर्वाधिक धावा दिल्या होत्या. आरसीबीविरुद्धच्या सामन्यात ४ षटकात ७० धावा दिल्या होत्या. आरसीबीच्या मोइन अलीने पहिल्या षटकात दोन षटकार ठोकल्याने १९ धावा आल्या. दूसऱ्या षटका डिव्हिलिअर्सने १८ धावा केल्या. त्यानंतर शेवटच्या दोन षटकात ग्रँडहोम आणि सरफराज खान यांनी वादळी खेळी केली. त्यामुळे बेसिलच्या नावावर नकोसा विक्रम प्रस्थापित झाला. त्याने ४ षटकात एकूण ७० धावा दिल्या. त्याला एकही गडी टीपता आला नाही.
करोनाबाधित अक्षर पटेलच्या प्रकृतीत सुधारणा; दिल्ली कॅपिटल्सकडून माहिती
आयपीएल २०१३ मध्ये हैदराबादकडून खेळण्याऱ्या इशांत शर्मा या यादीत दूसऱ्या क्रमांकावर आहे. चेन्नई सुपर किंग्जच्या फलंदाजांनी त्याला सळो की पळो करुन सोडलं होतं. इशांतच्या ४ षटकात एकूण ६६ धावा उभारल्या. पहिल्याच षटकात मायकल हसीने ११ धावा ठोकल्या. दूसऱ्या षटकात मुरली विजय आक्रमक खेळी करत ३ षटकार ठोकले आणि १८ धावा केल्या. तर शेवटच्या दोन षटकात सुरेश रैनाने इशांत शर्माच्या गोलंदाजीवर चौकार षटकारांचा पाऊस पाडला. त्यामुळे इशांतच्या ४ षटकात एकूण ६६ धावा आल्या. इशांतला एकही गडी बाद करता आला नाही.
मॅक्सवेलच्या उत्तुंग षटकारानंतर बंगळुरु-पंजाबमध्ये ट्विटरवर गंमतीदार टीवटीव
आयपीएल २०१४ साली पंजाबकडून खेळण्याऱ्या संदीप शर्माने महागडं षटक टाकलं. सनराईजर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात त्याने ४ षटकात एकूण ६५ धावा दिल्या. संदीपने पहिल्या आणि दूसऱ्या षटकात चांगली गोलंदाजी केली. त्याच्या पहिल्या षटकात ६ तर दूसऱ्या षटकात त्याला ७ धावा आल्या. मात्र शेवटच्या दोन षटकात शिखर धवन आणि नमन ओझा आक्रमक खेळी करत संदीप शर्माच्या नावावर नकोसा विक्रम केला. संदीप शर्मा एक गडी बाद करण्यास यशस्वी ठरला.
आयपीएल २०१३ मध्ये उमेश यादवने ४ षटकात ६५ धावा दिल्या. दिल्लीचा कर्णधार डेविड वॉर्नरने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय उमेश यादवच्या पथ्यावर पडला नाही. आरसीबीच्या फलंदाजांनी उमेश यादवची गोलंदाजी फोडून काढली. उमेश यादवने पहिल्या षटकात ८ धावा तर दूसऱ्या षटकात १० धावा दिल्या होत्या. मात्र अखेरच्या दोन षटकात कोहली आणि डिव्हिलियर्सने चौकार षटकार खेचत १२ चेंडूमध्ये ४७ धावा केल्या.