सिनेमा चालण्यासाठी तीन गोष्टी महत्त्वाच्या असतात आणि त्या म्हणजे ‘एण्टरटेन्मेंट, एण्टरटेन्मेंट आणि एण्टरटेन्मेंट’ असं आपण सर्वानी बॉलीवूड अभिनेत्री विद्या बालन हिच्या तोंडून ‘डर्टी पिक्चर’मध्ये ऐकले. सध्या साऱ्याच गोष्टी एण्टरटेन्मेंट असल्याशिवाय चालत नाहीत आणि त्याला क्रिकेटही अपवाद नाही. यालाच जोड देत ‘आयपीएल स्पर्धा म्हणजे भारतीय क्रिकेटची विद्या बालन आहे’ असे मत भारताचे माजी फिरकीपटू बिशनसिंग बेदी यांनी व्यक्त केले आहे.
बिशनसिंग बेदी हे आपल्या खरपूस टीकेसाठी ओळखले जातात. त्यांच्या मते कसोटी हा क्रिकेटचा पाया आहे, ती आपली परंपरा असून त्याला आपण सोडता कामा नये, असे बेदी यांना वाटते.बेदी म्हणाले की, कसोटी क्रिकेट ही आपली परंपरा आहे आणि तिला आपण जपायला हवे. पण या पंरपरेला जपण्यासाठी आपण प्रयत्नशील नसल्याचे चित्र आहे. आयपीएल हे माझ्या पचनी पडणारे नाही. माझ्या मते आयपीएल स्पर्धा ही भारतीय क्रिकेटची विद्या बालन आहे, ‘एण्टरटेन्मेंट, एण्टरटेन्मेंट आणि एण्टरटेन्मेंट’ हाच फक्त त्याचा हेतू आहे.
आयपीएल भारतीय क्रिकेटची विद्या बालन -बिशनसिंग बेदी
सिनेमा चालण्यासाठी तीन गोष्टी महत्त्वाच्या असतात आणि त्या म्हणजे ‘एण्टरटेन्मेंट, एण्टरटेन्मेंट आणि एण्टरटेन्मेंट’ असं आपण
First published on: 09-09-2013 at 04:23 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl is the vidya balan of indian cricket bishan singh bedi