आयपीएलच्या १५ व्या पर्वासाठी मुंबई इंडियन्सने यंदाच्या पर्वातील सर्वात मोठी बोली लावत इशान किशनला विकत घेतलं आहे. आजपासून सुरु झालेल्या दोन दिवसीय लिलावामध्ये इशानला मुंबईने १५.२५ कोटींची बोली लावत संघात घेतलंय.
मागील पर्वामध्येही इशान मुंबईच्या संघातच होता. मात्र संघाने त्याला रिटेन केलं नव्हतं. इशानची बेस प्राइज दोन कोटी रुपये इतकी होती. म्हणजेच त्याला बेस प्राइजपेक्षा सात पट अधिक रक्कम देत विकत घेण्यात आलंय. मुंबईबरोबरच इतरही अनेक संघांनी इशानसाठी मोठी बोली लावली होती. मात्र मुंबईने या शर्यतीमध्ये बाजी मारली.
नक्की पाहा >> IPL Auction 2022: लिलाव सुरु असताना अचानक ऑक्शनर कोसळला अन्…; धक्कादायक Video व्हायरल
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच कोणत्याही लिलावात एखाद्या खेळाडूला १० कोटींहून अधिक किंमत देत विकत घेतलंय. इशान पहिल्यांदा मुंबईकडून खेळलेला तेव्हा त्याला ६.२ कोटी रुपये मिळाले होते. म्हणजेच त्याला यंदा ९ कोटी रुपये अधिक मिळालेत.
नक्की पाहा हे फोटो >> Photos: IPL मधील सर्वात महागड्या खेळाडूंच्या यादीत ३ नवे चेहरे; पण पहिल्या क्रमांकापासून इशान ७५ लाख दूरच
२३ वर्षीय इशान किशनचा टी-२० मधील दमदार फॉर्म या मोठ्या बोली मागील मुख्य कारण आहे. त्याने १०४ खेळींमध्ये २८ च्या सरासरीने २ हजार २७६ धावा केल्या आहेत. यामध्ये दोन शतकं आणि १५ अर्धशकतांचा समावेश आहे. या विकेटकीपर फलंदाजाचा स्ट्राइक रेट १३५ इतका आहे. टी-२० च्या हिशोबाने हा उत्तम स्ट्राइक रेट आहे. याचमुळे पाच वेळा स्पर्धा जिंकणाऱ्या मुंबईने एवढी मोठी बोली लावत इशानला संघात घेतलंय. इशान टी-२० विश्वचषकामध्येही भारतीय संघाचा भाग होता. त्यानंतर दोन वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेमध्ये रोहितसोबत सलामीवीर म्हणून खेळताना दिसलेला.
नक्की वाचा >> IPL Auction 2022: शाहरुखच्या KKR ला मिळाला मुंबईकर कॅप्टन?; तब्बल १२.२५ कोटी मोजून संघात दिलं स्थान
नक्की वाचा >> IPL Auction 2022: गब्बरची जबर कमाई… चौपट अधिक किंमत मिळत ठरला लिलाव झालेला पहिला खेळाडू
इशान किशन हा आयपीएल लिलावामध्ये खरेदी करण्यात आलेला दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरलाय. यापूर्वी २०१५ मध्ये युवराज सिंहसाठी १६ कोटींची बोली लावण्यात आलेली. इशान किशनने आधीच मुंबई आपली आवडती टीम असल्याचं म्हटलं होतं. यंदा आयपीएलचे सर्व सामने महाराष्ट्रातच होण्याची शक्यता आहे. इशान आधीपासूनच संघाचा भाग असल्याने याचा संघाला आणि इशानलाही फायदा होणार आहे.
नक्की वाचा >> IPL Auction 2022: धवन आणि अश्विनला लिलावात गमावल्यानंतर दिल्लीच्या संघाने केली मजेशीर मागणी
मुंबईच्या संघातील इतर मह्तवाचे खेळाडू मात्र दुसऱ्या संघांमध्ये गेलेत. यामध्ये प्रामुख्याने हार्दिक पंड्या, क्रुणाल पंड्या, क्विंटन डिकॉक आणि टेंट बोल्टसारख्या खेळाडूंचा समावेश आहे.