जगातील श्रीमंत टी-२० क्रिकेट लीग म्हणजेच आयपीएलच्या १५व्या हंगामासाठी दोन दिवस मेगा ऑक्शन होत आहे. आज या महालिलावाचा पहिला दिवस पार पडला. पहिल्या दिवशी ईशान किशन, दीपक चहर, आवेश खान, राहुल तेवतिया, राहुल त्रिपाठी, राहुल चहर, शार्दुल ठाकूर यांच्यावर पैशांचा पाऊस पडला आहे. आत्तापर्यंत झालेल्या लिलाव प्रक्रियेत भारतीय खेळाडूंटा वरचष्मा पाहायला मिळाला. यावेळी, मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्ज, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, सनरायझर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल्स, पंजाब किंग्ज, कोलकाता नाइट रायडर्स, दिल्ली कॅपिटल्ससह लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स हे दोन नवीन संघ लीगमध्ये सहभागी झाले आहेत.
पहिल्या दिवशी ९७ खेळाडूंवर बोली लागली. ७४ खेळाडूंना संघात स्थान मिळाले, तर २३ खेळाडूंना एकही खरेदीदार मिळाला नाही. ईशान किशनला (१५.२५) सर्वाधिक रक्कम मिळाली, तर आवेश खान आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा अनकॅप्ड खेळाडू ठरला.
संदीप लामिछाने अनसोल्ड
आर साईकिशोरसाठी गुजरातने बोली लावली. त्यांनी ३ कोटी देत साईकिशोरला संघात घेतले.
हैदराबादने जगदीश सुचितसाठी बोली लावली. त्यांनी २० लाखांत सुचितला संघात घेतले.
फिरकीपटू श्रेयस गोपालसाठी हैदराबादने ७५ लाखांची बोली लावली आणि त्याला आपल्या ताफ्यात सामील केले.
केसी. करियप्पासाठी मुंबई, राजस्थान आणि केकेआरने बोली लावली. करियप्पासाठी राजस्थानने ३० लाख मोजले.
एम. सिद्धार्थ अनसोल्ड
मुरगन अश्विनसाठी मुंबई आणि हैदराबादने बोली लावली. मुंबईने त्याला १.६० कोटींमध्ये संघात दाखल केले.
गुजरातने ३० लाखात फिरकीपटू नूर अहमदला संघात घेतले.
लखनऊने ५० लाखांत अंकितसिंग राजपूतला संघात घेतले.
चेन्नईने तुषारला २० लाखात संघात दाखल केले.
पंजाबने २५ लाखांत इशान पोरेलला संघात दाखल करून घेतले.
जलदगती गोलंदाज आवेश खानसाठी चुरशीची लढत पाहायला मिळाली. लखनऊने त्याच्यासाठी १० कोटी मोजले.
वेगवान गोलंदाज आसिफसाठी चेन्नईने २० लाखांची बोली लावली.
बंगळुरूने आकाश दीपसाठी २० लाखाची बोली लावत त्याला संघात दाखल केले.
हैदराबादने कार्तिकला आपल्या ताफ्यात सामील केले. कार्तिकला ४ कोटींची बोली लागली.
वेगवान गोलंदाज बेसिल थम्पीसाठी मुंबईने बोली लावली. त्यांनी ३० लाखांत थम्पीला संघात घेतले.
पंजाब किंग्जने जितेशला २० लाखात संघात घेतले.
केकेआरने शेल्डन जॅक्सनला ६० लाखात संघात घेतले.
पंजाब किंग्ज आणि लखनऊने प्रभसिमरन सिंगसाठी बोली लावली. पंजाबने त्यासला ६० लाखात संघात घेतले.
एन जगदीशन अनसोल्ड
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने अनुजसाठी ३.४० कोटी मोजले.
विष्णू सोलंकी अनसोल्ड
विष्णू विनोद अनसोल्ड
मोहम्मद अझरुद्दीनसाठी अनसोल्ड
यष्टीरक्षक फलंदाज केएस भरतसाठी दिल्लीने २ कोटी मोजले.
शाहबाज अहमदसाठी हैदराबाद आणि बंगळुरूने बोली लावली. बंगळुरूने २.४० कोटींमध्ये त्याला संघात घेतले.
पंजाब, बंगळुरूने हरप्रीतसाठी बोली लावली. पंजाबने हरप्रीत ब्रारला ३.८० कोटीमध्ये संघात दाखल केले.
कमलेश नारकोटीसाठी दिल्ली आणि कोलकाताने बोली लावली. दिल्लीने त्याला १.१० कोटींमध्ये संघात दाखल केले.