जगातील श्रीमंत टी-२० क्रिकेट लीग म्हणजेच आयपीएलच्या १५व्या हंगामासाठी दोन दिवस मेगा ऑक्शन होत आहे. आज या महालिलावाचा पहिला दिवस पार पडला. पहिल्या दिवशी ईशान किशन, दीपक चहर, आवेश खान, राहुल तेवतिया, राहुल त्रिपाठी, राहुल चहर, शार्दुल ठाकूर यांच्यावर पैशांचा पाऊस पडला आहे. आत्तापर्यंत झालेल्या लिलाव प्रक्रियेत भारतीय खेळाडूंटा वरचष्मा पाहायला मिळाला. यावेळी, मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्ज, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, सनरायझर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल्स, पंजाब किंग्ज, कोलकाता नाइट रायडर्स, दिल्ली कॅपिटल्ससह लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स हे दोन नवीन संघ लीगमध्ये सहभागी झाले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
पहिल्या दिवशी ९७ खेळाडूंवर बोली लागली. ७४ खेळाडूंना संघात स्थान मिळाले, तर २३ खेळाडूंना एकही खरेदीदार मिळाला नाही. ईशान किशनला (१५.२५) सर्वाधिक रक्कम मिळाली, तर आवेश खान आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा अनकॅप्ड खेळाडू ठरला.
दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज डेव्हिड मिलर ठरला आयपीएल मेगा ऑक्शन २०२२चा पहिला अनसोल्ड खेळाडू.
स्फोटक फलंदाज रॉयसाठी २ कोटी देत गुजरात टायटन्सने आपल्या संघात घेतले.
अनुभवी भारतीय फलंदाज उथप्पाची बेस प्राइज २ कोटी होती. चेन्नई सुपर किंग्जने याच किमतीत उथप्पाला संघात घेतले.
हेटमायरसाठी दिल्ली आणि राजस्थान संघाने चुरस दाखवली. शेवटी राजस्थान रॉयल्सने ८.५० कोटी देत हेटमायरला संघात घेतले.
सनरायझर्स हैदराबादने मनीषसाठी बोलीची सुरुवात केली. लखनऊ सुपर जायंट्सने ४.६० कोटी देत मनीषला आपल्या संघात घेतले.
सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नरसाठी ६.२५ कोटी देत दिल्ली कॅपिटल्सने आपल्या ताफ्यात सामील केले.
धाकड सलामीवीर फलंदाज क्विंटन डी कॉकला ६.७५ कोटींची बोली लावत लखनऊ सुपर जायंट्सने संघात घेतले.
डु प्लेसिसला ७ कोटी देत आरसीबीने संघात घेतले.
वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीसाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने बोली उघडली. शमीला ६.२५ कोटी देत गुजरात टायटन्सने संघात घेतले.
बंगळुरूने अय्यरसाठी बोली लावली. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सनेही रस दाखवला. शेवटी केकेआरने १२.२५ कोटींमध्ये अय्यरला संघात घेतले.
Sample that for a bid ?? – @ShreyasIyer15 is a Knight @KKRiders #TATAIPLAuction @TataCompanies pic.twitter.com/19nIII9ihD
— IndianPremierLeague (@IPL) February 12, 2022
वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टसाठी सुरुवातीला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने बोली लावली. राजस्थान रॉयल्सने ८ कोटी देत बोल्टला संघात घेतले.
पंजाब संघाने ९.२५ कोटी इतक्या किमतीला रबाडाला संघात घेतले आहे.
वेगवान गोलंदाज पॅट कमिन्ससाठी कोलकाता नाइट रायडर्सने बोलीची सुरुवात केली. गुजरात टायटन्सने कमिन्ससाठी बोली लावली. केकेआरने ७.२५ कोटींमध्ये कमिन्सला संघात घेतले.
अश्विनला संघात घेण्यासाठी दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्सने रस दाखवला. राजस्थानने ५ कोटींमध्ये अश्विनला आपल्या संघात घेतले आहे.
डावखुरा सलामीवीर फलंदाज शिखर धवनला महालिलावाचा पहिला मान मिळाला आहे. पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्सने गब्बरला संघात घेण्यासाठी बोली लावली. पंजाब किंग्जने ८.२५ कोटी रुपये खर्च करत धवनला संघात घेतले आहे.
Congratulations to @SDhawan25 #TATAIPLAuction @TataCompanies pic.twitter.com/8LepZC7F2R

प्रत्येक संघ आपल्या संघात जास्तीत जास्त २५ खेळाडू ठेवू शकतो.
The #TATAIPLAuction 2022 is almost here, where your favourite teams’ future will be decided! This is where their road to success shall begin.
— IndianPremierLeague (@IPL) February 8, 2022
Catch every move from the mega auction:
Feb 12-13, 11 AM onwards | @StarSportsIndia & @DisneyPlusHS pic.twitter.com/ECigmZQtBN
जेव्हा दोन संघ लिलावात 'टाय' करतील आणि त्या खेळाडूच्या बोलीसाठी त्यांचे सर्व पैसे लावतील, तेव्हा ते अंतिम 'बंद' बोलीची रक्कम जमा करू शकतात. ज्या संघाची सर्वाधिक बोली असेल, त्या संघाला संबंधित खेळाडू मिळेल. अतिरिक्त बोलीची रक्कम बीसीसीआयकडे जमा केली जाईल आणि ती ९० कोटींच्या रकमेचा भाग असणार नाही.
लिलावापूर्वी खेळाडूंच्या यादीत १० जणांचा समावेश करण्यात आला आहे. अग्निवेश अयाची, रोहन राणा, नितीश रेड्डी, हार्दिक तामोरे, मिहिर हिरवाणी, साईराज पाटील, मोनू सिंग, निवेतन राधाकृष्णन, लान्स मॉरिस, आरोन हार्डी हे खेळाडू लिलावाचा भाग असतील.
लिलावापूर्वी प्रक्रियेत बदल करण्यात आला आहे. आज किमान ९७ खेळाडूंवर बोली लावली जाणार आहे. वेळ वाचल्यास ही संख्या १०६ वरून ११६ पर्यंत जाऊ शकते. पहिल्या १८ सेटसाठी म्हणजेच १६१ खेळाडूंवर हळूहळू बोली लावली जाईल. यावेळी ऑक्शनची जबाबदारी ह्यूज एडमीड्स (hugh edmeades) यांच्याकडे आहे.
The Stage is set ??

Just under an hour away from the #TATAIPLAuction 2022 ??? pic.twitter.com/RyvrLvyG2j