श्रेयस अय्यर आयपीएल लिलावाच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. याचबरोबर श्रेयस अय्यर सर्वात महागडा भारतीय खेळाडू ठरला आहे. पंजाब किंग्स संघाने २५.७५ कोटींना आपली पर्स रिकामी करत अय्यरला संघात सामील केले. श्रेयसवर सुरूवातीला पूर्वीचा संघ कोलकाता नाईट रायडर्सनेच बोली लावण्यास सुरूवात केली. तर पंजाब किंग्सचा संघही बोली लावण्यासाठी उतरला. १० कोटींनंतर कोलकाता संघ थांबला पण शेवटपर्यंत दिल्ली आणि पंजाबमध्ये श्रेयस अय्यरसाठी बोली लावली जात होती. १६.५० कोटींचा टप्पा गाठताच श्रेयस अय्यर सर्वात महागडा भारतीय खेळाडू ठरला. यानंतर २५.७५ कोटींचा टप्पा गाठताच श्रेयस अय्यर आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली कोलकत्ता नाईट रायडर्स संघाने आयपीएल २०२४ चे जेतेपद पटकावले. तरीही कोलकत्ता संघाने श्रेयस अय्यरला आयपीएल २०२५ पूर्वी रिटेन्शनमध्ये रिलीज केले. लिलावापूर्वी श्रेयस अय्यरची बॅट चांगली तळताना दिसत आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये रणजी सामन्यांमध्ये खेळताना श्रेयस अय्यरने शतकी कामगिरी केली. नंतर सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी टी-२० सामन्यामध्ये गोवा विरुद्ध खेळताना श्रेयसने उत्कृष्ट शतक झळकावले आणि त्याच्या शतकाच्या जोरावर मुंबई संघाला विजय मिळवण्यात यश आले.

श्रेयस अय्यरने टी-२० मध्ये आतापर्यंत ५७५९ धावा केल्या आहेत. यामध्ये ३६ अर्धशतकं आणि ३ शतकांचा समावेश आहे.