करोना व्हायरसच्या भितीच्या सावटामुळे आयपीएलची स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आधीच्या वेळापत्रकाप्रमाणे आयपीएल २९ मार्च रोजी सुरू होणार होती परंतु आता ती १५ एप्रिल रोजी सुरू असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. तशी कल्पना सगळ्या संघांच्या मालकांना देण्यात आली आहे.

जगभरातील ११० पेक्षा जास्त देशांमध्ये करोनाचा प्रसार झाला असून भारतामध्येही ८० जणांना लागण झाल्याचे आढळले आहे. सर्व पातळींवर करोनाचा सामना करण्याचे आवाहन करण्यात येत असून अशा वातावरणात आयपीएल भरवणे धोक्याचे असल्याचे प्रतिक्रिया व्यक्त होती. या पार्श्वभूमीवर आयपीएल पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आणखी वाचा- दिल्लीत आयपीएल सामने नाही; करोनामुळे केजरीवाल सरकारचा महत्वपूर्ण निर्णय

केंद्र सरकारनं बुधवारी सर्व व्हिसा १५ एप्रिल पर्यंत रद्द करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर दिल्लीमध्ये बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली व आयपीएल पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.

Story img Loader