IPL 2025 Players Retention Live Updates : आयपीएल २०२५ च्या हंगामापूर्वी नोव्हेंबरमध्ये मेगा ऑक्शन होणार आहे. याआधी, सर्व १० फ्रँचायझींना कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करण्याची शेवटची मुदत ३१ ऑक्टोबर देण्यात आली आहे. त्यामुळे आज सर्व १० फ्रँचायझी कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी सादर करणार आहेत. सर्व फ्रँचायझी जास्तीत ज्सात ६ खेळाडूंना कायम ठेवू शकतात. ज्यामध्ये ५ कॅप्ड खेळाडू आणि २ अनकॅप्ड भारतीय खेळाडू कायम ठेवले जाऊ शकतात.
IPL Retention 2025 Live Updates : आयपीएल २०२५ साठी सर्व १० फ्रँचायझी त्यांच्या कायम ठेवलेल्या खेळाडूंची नावे आज जाहीर करतील. ज्यामध्ये अनेक मोठे निर्णय घेतले जातील. ज्यावरुन मेगा ऑक्शनचे चित्र स्पष्ट होईल.
सीएसकेने या 5 खेळाडूंना कायम ठेवले
चेन्नई सुपर किंग्ज संघाने महेंद्रसिंग धोनी (4 कोटी), ऋतुराज गायकवाड (18 कोटी), रवींद्र जडेजा (18 कोटी), शिवम दुबे (12 कोटी) आणि मथिशा पाथिराना (13 कोटी) यांना आयपीएल 2025 साठी कायम ठेवले आहे. धोनीला अनकॅप्ड खेळाडू म्हणून कायम ठेवण्यात आले आहे.
https://twitter.com/Abhayti05059972/status/1851960558343389646
मुंबईने या खेळाडूंना कायम ठेवले
मुंबईने पाचही कॅप्ड खेळाडूंना कायम ठेवले आहे. त्यांनी जसप्रीत बुमराहला 18 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवले आहे. त्याच वेळी, फ्रँचायझीने सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्याला 16.35-16.35 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवले आहे. मुंबईने रोहितला 16.30 कोटींमध्ये रिटेन केले आहे. त्याच वेळी, टिळक वर्मा यांना फ्रँचायझीने 8 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवले आहे.
कायम ठेवण्याचे नियम काय आहेत? ते जाणून घ्या
एक संघ जास्तीत जास्त 6 खेळाडू कायम ठेवू शकतो.
कोणताही संघ पाचपेक्षा जास्त कॅप्ड खेळाडूंना कायम ठेवू शकत नाही.
कोणताही संघ दोनपेक्षा जास्त अनकॅप्ड खेळाडूंना कायम ठेवू शकत नाही.
https://twitter.com/TamilSelvan2920/status/1851954013853426139
मुंबई या खेळाडूंना कायम ठेवणार का?
अहवालानुसार मुंबई इंडियन्स हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांना कायम ठेवणार आहे. तर नमन धीरला अनकॅप्ड खेळाडू म्हणून कायम ठेवण्यात येईल.
ही मोठी नावे लिलावात पाहायला मिळतील?
रिपोर्टनुसार, ऋषभ पंत, केएल राहुल, श्रेयस अय्यर, इशान किशन, मोहम्मद शमी, युझवेंद्र चहल, रविचंद्रन अश्विन, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर आणि दीपक चहर सारखे स्टार खेळाडू IPL 2025 च्या लिलावात दिसणार आहेत.
गुजरात टायटन्स मोहम्मद शमीला कायम ठेवणार नाही?
गुजरात टायटन्स कर्णधार शुभमन गिल, साई सुदर्शन आणि रशीद खान यांना कॅप्ड खेळाडू म्हणून कायम ठेवू शकते. शाहरुख खान आणि राहुल तेवतिया यांना अनकॅप्ड खेळाडू म्हणून कायम ठेवता येईल. संघ मोहम्मद शमी आणि डेव्हिड मिलरला सोडणार आहे.
बीसीसीआयने सर्व १० फ्रँचायझी संध्याकाळी ५:३० वाजेपर्यंत कायम ठेवलेल्या सर्व खेळाडूंच्या नावांची यादी जाहीर करण्याची डेडलाइन दिली आहे.
शुबमन गिल प्रत्येक परिस्थितीत संघाच्या पाठीशी उभा
आयपीएल २०२४ मध्ये गुजरातची कामगिरी काही खास नव्हती. आता फ्रँचायझीने संघ नव्याने तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात गिल यांनी आपल्या पगारात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. ३१ ऑक्टोबरच्या अंतिम मुदतीपूर्वी या आयपीएल फ्रँचायझीने कायम ठेवलेला तो दुसरा खेळाडू असेल. फ्रँचायझीसाठी कायम ठेवले जाणारा पहिला खेळाडू स्टार फिरकीपटू राशिद खान असेल, त्यानंतर संघ गिल, साई सुदर्शन आणि दोन अनकॅप्ड (ज्यांनी कोणतेही आंतरराष्ट्रीय सामने खेळलेले नाहीत) राहुल तेवतिया आणि शाहरुख खान यांना कायम ठेवता येईल.
कमीत कमी एक अनकॅप्ड खेळाडू
फ्रँचायझी ज्या सहा खेळाडूंना रिटेन करू इच्छिते, त्यापैकी किमान एक खेळाडू हा अनकॅप्ड भारतीय खेळाडू असला पाहिजे. उर्वरित पाच भारतीय किंवा परदेशी खेळाडू असू शकतात. याशिवाय, ज्या सहा खेळाडूंना फ्रँचायझी कायम ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे त्यांना एकतर थेट धारणा आणि RTM पर्यायांच्या संयोजनाद्वारे किंवा फक्त RTM पर्यायांतर्गत राखले जाऊ शकते.
आयपीएलच्या इतिहासात प्रथमच मॅच फी लागू करण्यात आली आहे. प्रत्येक प्लेईंग इलेव्हनमधील खेळाडूला (प्रभावी खेळाडूसह) प्रत्येक सामन्यासाठी ७.५ लाख रुपये मॅच फी मिळेल, जी त्यांच्या कराराच्या रकमेव्यतिरिक्त असेल. परदेशी खेळाडूंना आयपीएल लिलावासाठी नावाची नोंदणी करणे अनिवार्य असेल. परदेशी खेळाडूने नोंदणी न केल्यास तो पुढील वर्षी होणाऱ्या खेळाडूंच्या लिलावात नोंदणीसाठी अपात्र ठरेल. एखाद्या खेळाडूची लिलावात निवड झाल्यानंतर, हंगाम सुरू होण्यापूर्वी जर सामने खेळण्यासाठी उपलब्ध नसेल तर, त्याला स्पर्धेत भाग घेण्यास आणि २ हंगामांसाठी लिलावात बंदी घालण्यात येईल.
काही वेळात सर्व काही स्पष्ट होईल
गेल्या दिवसापासून कायम ठेवण्यासंदर्भात अनेक आश्चर्यकारक बातम्या समोर आल्या आहेत. कधी चेन्नई सुपर किंग्ज रवींद्र जडेजाला सोडणार असल्याचे सांगण्यात आले, तर काही रिपोर्ट्समध्ये ऋषभ पंत, आंद्रे रसेल, मिचेल स्टार्क, मोहम्मद सिराज या खेळाडूंनाही सोडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. बरं, आता थोड्याच वेळात सर्व काही स्पष्ट होईल. काही वेळातच सर्व संघ त्यांच्या सोडलेल्या आणि कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करतील.
कोलकाता नाइट रायडर्स आंद्रे रसेलला कायम ठेवणार की नाही?
कोलकाता फ्रँचायझी आंद्रे रसेलला सोडू शकते. यासह रसेलचा कोलकातासोबतचा 10 वर्षांचा संबंधही संपुष्टात येणार आहे. रसेल अनेक वर्षांपासून केकेआरसोबत आहे, पण याआधी तो केकेआरच्या फायनलला मुकला होता. रसेलने आयपीएलचे विजेतेपद पटकावण्याची ही पहिलीच वेळ आहे. तेही केकेआरसोबत. केकेआरसाठी रसेल हा चॅम्पियन खेळाडू राहिला आहे.
राजस्थान रॉयल्स आयपीएल २०२५ साठी जोस बटलरला कायम ठेवणार की नाही?
अष्टपैलू रियान पराग, अनुभवी फिरकीपटू रवीचंद्रन अश्विन आणि युझवेंद्र चहल यांच्यासह डावखुरा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट असे एकापेक्षा एक सरस खेळाडू राजस्थानकडे आहेत. सध्याच्या घडीला टी-२० क्रिकेटमधील उत्कृष्ट फलंदाजांपैकी एक असलेला खेळाडू म्हणजे जोस बटलर आहे. पण बटलर गेल्या ३ महिन्यांपासून दुखापतीने त्रस्त आहे, त्यामुळे संघाच्या भविष्याचा विचार करता त्याला रिटेन करतील की नाही यात शक्यता आहे. त्याचबरोबर संघाचा फलंदाज ध्रुव जुरेल आणि फिरकीपटू युजवेंद्र चहल यांच्यासाठी राईट टू मॅच कार्ड वापरतील. अधिक खेळाडू रिटेन केल्यास लिलावात संघाला कमी रक्कम राहणार आहे. रिटेन्शन व्यतिरिक्त संघाकडे राईट टू मॅच वापरण्याचा अधिकार आहे.
https://twitter.com/IPL/status/1840334911556772268
हार्दिककडेच मुंबई संघाची सूत्रं असतील हे स्पष्ट असल्याने रिटेन्शन यादीत तो अव्वल स्थानी असेल. चाळिशीकडे झुकलेला आणि आंतरराष्ट्रीय टी२० प्रकारातून निवृत्ती घेतलेला रोहित शर्मा आणखी किती वर्ष खेळणार याबाबत स्पष्टता नाही. पण आणखी काही वर्ष रोहितने आपल्यासाठीच खेळावं असा मुंबईचा आग्रह असेल. मुंबई इंडियन्सकडून खेळतानाच सूर्यकुमार यादवने स्वत:च्या गुणवत्तेला न्याय देत दमदार भरारी घेतली. आंतरराष्ट्रीय टी२० प्रकारात सूर्यकुमारने अव्वल स्थानीही झेप घेतली. या प्रकारात सूर्यकुमार भारताचा कर्णधारही झाला. सूर्यकुमार मुंबई इंडियन्सचा कर्णधार होईल अशी चिन्हं होती. मात्र संघव्यवस्थापनाने हार्दिकच्या नावाला पसंती दिली. पण सूर्यकुमार मुंबईच्या फलंदाजीचा कणा असेल हे नक्की.
राईट टू मॅच कार्ड म्हणजे काय?
आयपीएलच्या गव्हर्निंग काऊन्सिलच्या बैठकीत राईट टू मॅच नियम परत आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लिलावापूर्वी पाच खेळाडूंना कायम ठेवणाऱ्या फ्रँचायझीला एकूण १२० कोटी रुपयांपैकी ७५ कोटी रुपये पर्समधून खर्च करण्याची परवानगी असेल. राईट टू मॅच म्हणजे लिलावापूर्वी एखादा संघ आपल्या कोणत्याही खेळाडूला कायम ठेवू शकला नाही, तर लिलावाच्या वेळी त्याला पुन्हा आपल्या संघात घेण्याची संधी मिळते, परंतु त्यासाठी त्या काळात इतर काही फ्रँचायझीने त्या खेळाडूसाठी जेवढे पैसे दिले आहेत ते त्याने बोली लावलेल्या रकमेत समाविष्ट करू शकतात. ही किंमत त्या खेळाडूच्या मागील किमतीपेक्षा कमी किंवा जास्त असू शकते.
लखनौ सुपरजायंट्स फ्रँचायझी कर्णधार केएल राहुलला सोडण्याचा निर्णय घेऊ शकते. मात्र, यामागे अनेक कारणे दिली जात आहेत. आयपीएल 2024 मध्ये फ्रँचायझी मालक संजीव गोयंका यांच्याशी राहुलच्या भांडणापासून ते T20 मधील त्याच्या खराब फलंदाजीपर्यंत. मात्र, सर्वात मोठे कारण म्हणजे राहुलला टी-20मधील परिस्थितीनुसार फलंदाजी करता आली नाही. तो परिस्थितीशी जुळवून घेऊ शकला नाही. या कारणास्तव, तो एलएसजीमध्ये कायम ठेवण्याच्या शर्यतीत मागे पडला, तर मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर आणि मार्गदर्शक झहीर खान यांच्या निवडीनुसार फ्रँचायझीने उत्कृष्ट फिनिशर निकोलस पूरन यांना कायम ठेवण्यास उत्सुक असल्याचे समजते.
कोहली 2025 मध्ये कर्णधार होताना दिसणार आहे
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, विराट कोहली आयपीएल 2025 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे नेतृत्व करताना दिसणार आहे. IPL 2021 नंतर कोहलीने कर्णधारपद सोडले होते. यानंतर फाफ डुप्लेसिसने संघाची धुरा सांभाळली होती.
दिल्ली कॅपिटल्स ऋषभ पंतला कायम ठेवणार नाही
ऋषभ पंत आणि दिल्ली कॅपिटल्स वेगळे होणार आहेत. तो लिलावात उतरेल. वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, डीसीचे चार रिटेन केलेले खेळाडू अक्षर पटेल, कुलदीप यादव, अभिषेक पोरेल आणि ट्रिस्टन स्टब्स आहेत. संघाला त्यांच्यासोबत श्रेयस अय्यरचा समावेश करायचा आहे. आयपीएल लिलावात पंतला विकत घेण्यासाठी लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज आपली सर्व ताकद वापरू शकतात.
फ्रँचायझी पाच कॅप्ड खेळाडूंना कायम ठेवू इच्छित असल्यास, त्याच्या पर्समधून खालील रक्कम वजा केली जाईल:
पहिल्या तीन रिटेंशनसाठी, फ्रँचायझीच्या पर्समधून रु. 18 कोटी (प्लेअर-1), रु. 14 कोटी (प्लेअर-2) आणि रु. 11 कोटी (प्लेअर-3) कापले जातील.
उर्वरित दोन रिटेंशनसाठी, रु. 18 कोटी (प्लेअर-4) आणि रु. 14 कोटी (प्लेअर-5) कोणत्याही फ्रँचायझीच्या पर्समधून कापले जातील.
याचा अर्थ असा की लिलावापूर्वी पाच कॅप्ड खेळाडूंना कायम ठेवणाऱ्या फ्रँचायझींचे एकूण 120 कोटी रुपयांपैकी 75 कोटी रुपये कपात केले जातील.
चेन्नई सुपर किंग्ज - ऋतुराज गायकवाड, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंग धोनी, मथिशा पथिराणा आणि शिवम दुबे
सनरायझर्स हैदराबाद - हेनरिक क्लासेन, पॅट कमिन्स, अभिषेक शर्मा, नितीश रेड्डी आणि ट्रॅव्हिस हेड
लखनौ सुपर जायंट्स - निकोलस पूरन, रवी बिश्नोई, मयंक यादव, आयुष बडोनी आणि मोहसिन खान
कोलकाता नाइट रायडर्स - सुनील नरेन, रिंकू सिंग, वरुण चक्रवर्ती आणि हर्षित राणा
राजस्थान रॉयल्स - संजू सॅमसन, यशस्वी जैस्वाल, रियान पराग आणि संदीप शर्मा
गुजरात टायटन्स - शुबमन गिल, राशिद खान, साई सुदर्शन, राहुल तेवतिया आणि शाहरुख खान</p>
दिल्ली कॅपिटल्स - अक्षर पटेल, कुलदीप यादव, ट्रिस्टन स्टब्स, जॅक फ्रेझर मॅकगर्क आणि अभिषेक पोरेल.
मुंबई इंडियन्स - जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा आणि नमन धीर
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - विराट कोहली, फाफ डुप्लेसिस, मोहम्मद सिराज, महिपाल लोमरोर आणि कर्ण शर्मा
पंजाब किंग्स - शशांक सिंग आणि प्रभसिमरन सिंग
आज रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी एका कार्यक्रमामध्ये संघांकडून जाहीर केली जाणार आहे, हा कार्यक्रम कुठे लाईव्ह पाहता येणार आहे, हे जाणून घेऊया. IPL 2025 साठी संघात कायम ठेवल्या जाणाऱ्या खेळाडूंची संपूर्ण माहिती जिओ सिनेमावर दिली जाईल. यासाठी एक विशेष कार्यक्रम ३१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४.३० वाजल्यापासून जिओ सिनेमावर सादर केला जाणार असून त्याद्वारे रिटेन, रिलीज खेळाडूंची माहिती चाहत्यांना मिळणार आहे.
https://twitter.com/IPL/status/1851901320740917306
इंडियन प्रीमियर लीग २०२५ रिटेंशनचे मोफत लाइव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमा ॲप आणि वेबसाइटवर घेऊ पाहता येणार आहे. जिओ सिनेमाने ३१ ऑक्टोबरला हा कार्यक्रम आपल्या प्लॅटफॉर्मवर विनामूल्य पाहण्याची घोषणा केली आहे. इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२५ च्या मेगा लिलावाची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. मात्र, नोव्हेंबरच्या अखेरीस किंवा डिसेंबरच्या सुरुवातीला लिलाव असेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.