IPL 2025 Players Retention Highlights : आयपीएल २०२५ पूर्वी मेगा ऑक्शन होणार आहे. तत्पूर्वी, सर्व १० फ्रँचायझींनी गुरुवारी (३१ ऑक्टोबर) कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली. सनरायझर्स हैदराबादने हेनरिक क्लासेनला सर्वाधिक २३ कोटी रुपयांमध्ये रिटेन केले आहे. विराट कोहलीला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने २१ कोटींना रिटेन केले. ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, केएल राहुल आणि इशान किशन यांसारखी मोठी नावे लिलावात दिसणार आहेत.
IPL Retention 2025 Highlights : आयपीएल २०२५ साठी सर्व १० फ्रँचायझी त्यांच्या कायम ठेवलेल्या खेळाडूंची नावे आज जाहीर केली आहेत. ज्यामध्ये अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहे. ज्यावरुन मेगा ऑक्शनचे चित्र स्पष्ट झाले आहे.
राईट टू मॅच कार्ड म्हणजे काय?
आयपीएलच्या गव्हर्निंग काऊन्सिलच्या बैठकीत राईट टू मॅच नियम परत आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लिलावापूर्वी पाच खेळाडूंना कायम ठेवणाऱ्या फ्रँचायझीला एकूण १२० कोटी रुपयांपैकी ७५ कोटी रुपये पर्समधून खर्च करण्याची परवानगी असेल. राईट टू मॅच म्हणजे लिलावापूर्वी एखादा संघ आपल्या कोणत्याही खेळाडूला कायम ठेवू शकला नाही, तर लिलावाच्या वेळी त्याला पुन्हा आपल्या संघात घेण्याची संधी मिळते, परंतु त्यासाठी त्या काळात इतर काही फ्रँचायझीने त्या खेळाडूसाठी जेवढे पैसे दिले आहेत ते त्याने बोली लावलेल्या रकमेत समाविष्ट करू शकतात. ही किंमत त्या खेळाडूच्या मागील किमतीपेक्षा कमी किंवा जास्त असू शकते.
लखनौ सुपरजायंट्स फ्रँचायझी कर्णधार केएल राहुलला सोडण्याचा निर्णय घेऊ शकते. मात्र, यामागे अनेक कारणे दिली जात आहेत. आयपीएल 2024 मध्ये फ्रँचायझी मालक संजीव गोयंका यांच्याशी राहुलच्या भांडणापासून ते T20 मधील त्याच्या खराब फलंदाजीपर्यंत. मात्र, सर्वात मोठे कारण म्हणजे राहुलला टी-20मधील परिस्थितीनुसार फलंदाजी करता आली नाही. तो परिस्थितीशी जुळवून घेऊ शकला नाही. या कारणास्तव, तो एलएसजीमध्ये कायम ठेवण्याच्या शर्यतीत मागे पडला, तर मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर आणि मार्गदर्शक झहीर खान यांच्या निवडीनुसार फ्रँचायझीने उत्कृष्ट फिनिशर निकोलस पूरन यांना कायम ठेवण्यास उत्सुक असल्याचे समजते.
कोहली 2025 मध्ये कर्णधार होताना दिसणार आहे
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, विराट कोहली आयपीएल 2025 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे नेतृत्व करताना दिसणार आहे. IPL 2021 नंतर कोहलीने कर्णधारपद सोडले होते. यानंतर फाफ डुप्लेसिसने संघाची धुरा सांभाळली होती.
NEWS ? – IPL Governing Council announces TATA IPL Player Regulations 2025-27.
— IndianPremierLeague (@IPL) September 28, 2024
READ – https://t.co/3XIu1RaYns #TATAIPL pic.twitter.com/XUFkjKqWed
दिल्ली कॅपिटल्स ऋषभ पंतला कायम ठेवणार नाही
ऋषभ पंत आणि दिल्ली कॅपिटल्स वेगळे होणार आहेत. तो लिलावात उतरेल. वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, डीसीचे चार रिटेन केलेले खेळाडू अक्षर पटेल, कुलदीप यादव, अभिषेक पोरेल आणि ट्रिस्टन स्टब्स आहेत. संघाला त्यांच्यासोबत श्रेयस अय्यरचा समावेश करायचा आहे. आयपीएल लिलावात पंतला विकत घेण्यासाठी लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज आपली सर्व ताकद वापरू शकतात.
— IndianPremierLeague (@IPL) September 29, 2024
फ्रँचायझी पाच कॅप्ड खेळाडूंना कायम ठेवू इच्छित असल्यास, त्याच्या पर्समधून खालील रक्कम वजा केली जाईल:
पहिल्या तीन रिटेंशनसाठी, फ्रँचायझीच्या पर्समधून रु. 18 कोटी (प्लेअर-1), रु. 14 कोटी (प्लेअर-2) आणि रु. 11 कोटी (प्लेअर-3) कापले जातील.
उर्वरित दोन रिटेंशनसाठी, रु. 18 कोटी (प्लेअर-4) आणि रु. 14 कोटी (प्लेअर-5) कोणत्याही फ्रँचायझीच्या पर्समधून कापले जातील.
याचा अर्थ असा की लिलावापूर्वी पाच कॅप्ड खेळाडूंना कायम ठेवणाऱ्या फ्रँचायझींचे एकूण 120 कोटी रुपयांपैकी 75 कोटी रुपये कपात केले जातील.
चेन्नई सुपर किंग्ज – ऋतुराज गायकवाड, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंग धोनी, मथिशा पथिराणा आणि शिवम दुबे
सनरायझर्स हैदराबाद – हेनरिक क्लासेन, पॅट कमिन्स, अभिषेक शर्मा, नितीश रेड्डी आणि ट्रॅव्हिस हेड
लखनौ सुपर जायंट्स – निकोलस पूरन, रवी बिश्नोई, मयंक यादव, आयुष बडोनी आणि मोहसिन खान
कोलकाता नाइट रायडर्स – सुनील नरेन, रिंकू सिंग, वरुण चक्रवर्ती आणि हर्षित राणा
राजस्थान रॉयल्स – संजू सॅमसन, यशस्वी जैस्वाल, रियान पराग आणि संदीप शर्मा
गुजरात टायटन्स – शुबमन गिल, राशिद खान, साई सुदर्शन, राहुल तेवतिया आणि शाहरुख खान</p>
दिल्ली कॅपिटल्स – अक्षर पटेल, कुलदीप यादव, ट्रिस्टन स्टब्स, जॅक फ्रेझर मॅकगर्क आणि अभिषेक पोरेल.
मुंबई इंडियन्स – जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा आणि नमन धीर
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – विराट कोहली, फाफ डुप्लेसिस, मोहम्मद सिराज, महिपाल लोमरोर आणि कर्ण शर्मा
पंजाब किंग्स – शशांक सिंग आणि प्रभसिमरन सिंग
आज रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी एका कार्यक्रमामध्ये संघांकडून जाहीर केली जाणार आहे, हा कार्यक्रम कुठे लाईव्ह पाहता येणार आहे, हे जाणून घेऊया. IPL 2025 साठी संघात कायम ठेवल्या जाणाऱ्या खेळाडूंची संपूर्ण माहिती जिओ सिनेमावर दिली जाईल. यासाठी एक विशेष कार्यक्रम ३१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४.३० वाजल्यापासून जिओ सिनेमावर सादर केला जाणार असून त्याद्वारे रिटेन, रिलीज खेळाडूंची माहिती चाहत्यांना मिळणार आहे.
Few Hours To Go ⏰
— IndianPremierLeague (@IPL) October 31, 2024
Prediction Game Begins ?
Which players will be retained by their #TATAIPL teams? ✍️?
इंडियन प्रीमियर लीग २०२५ रिटेंशनचे मोफत लाइव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमा ॲप आणि वेबसाइटवर घेऊ पाहता येणार आहे. जिओ सिनेमाने ३१ ऑक्टोबरला हा कार्यक्रम आपल्या प्लॅटफॉर्मवर विनामूल्य पाहण्याची घोषणा केली आहे. इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२५ च्या मेगा लिलावाची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. मात्र, नोव्हेंबरच्या अखेरीस किंवा डिसेंबरच्या सुरुवातीला लिलाव असेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.