आयपीएलच्या पहिल्या हंगामाचं विजेतेपद पटकावल्यानंतर राजस्थान रॉयल्स संघाची आयपीएलमधली कामगिरी संमिश्र स्वरुपाची राहिलेली आहे. मध्यंतरीच्या काळात स्पॉट फिक्सींगसारख्या घटनांमुळे राजस्थानचा संघ वाईट कारणांसाठी चर्चेत होता. मात्र पुनरागमनाच्या हंगामापासून राजस्थानने धडाकेबाज खेळ करत आपलं महत्व सिद्ध केलं आहे.
IPL 2020 Auction : राजस्थानच्या संघात खेळाडूंचा भरणा
वाचा अधिक वृत्त <<https://t.co/s3Mk97fPBe>> #IPL2020Auction #IPLAuction @rajasthanroyals pic.twitter.com/Jz3BXSQl2w
— LoksattaLive (@LoksattaLive) December 19, 2019
लिलावाआधी राजस्थानने अजिंक्य रहाणेला दिल्लीच्या ताफ्यात पाठवत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. यंदा अँड्रू मॅक्डोनाल्ड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्टिव्ह स्मिथच्या नेतृत्वाखाली राजस्थानचा संघ नव्या दमाने तयार होतो आहे.
अवश्य वाचा – IPL 2020 Auction : दोन हंगाम महागडा खेळाडू ठरलेल्या जयदेव उनाडकटची घसरगुंडी
रॉबिन उथप्पा, डेव्हिड मिलर, जयदेव उनाडकट यांसारख्या प्रमुख खेळाडूंना संघात संधी देत राजस्थानने आगामी हंगामासाठी सावध पवित्रा आजमावला आहे. जाणून घेऊयात राजस्थान रॉयल्सचा संपूर्ण संघ…
फलंदाज – महिपाल लोमरोर, मनन व्होरा, रियान पराग, स्टिव्ह स्मिथ, रॉबीन उथप्पा (३ कोटी), डेव्हिड मिलर (७५ लाख)
गोलंदाज – अंकित राजपूत, मयांक मार्कंडे, जोफ्रा आर्चर, श्रेयस गोपाळ, वरुण अरॉन, जयदेव उनाडकट (३ कोटी), कार्तिक त्यागी (१ कोटी ३० लाख), अक्ष सिंह (२० लाख), ओश्ने थॉमस (५० लाख), अँड्रू टाय (१ कोटी)
अष्टपैलू – बेन स्टोक्स, राहुल तेवतिया, शशांक सिंह, यशस्वी जैस्वाल (२ कोटी ४० लाख), अनिरुद्ध जोशी (२० लाख), टॉम करन (१ कोटी)
यष्टीरक्षक – जोस बटलर, संजू सॅमसन, अनुज रावत (८० लाख)
दरम्यान, पहिल्या टप्प्यात बोली लागलेल्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे खेळाडू मालामाल झाले. पॅट कमिन्स आणि ग्लेन मॅक्सवेल या दोघांना १० कोटींहून अधिकची बोली लागली. लिलावाच्या दुसऱ्या टप्प्यात अनेक खेळाडू UNSOLD राहिले. कागदावर महत्त्वाच्या वाटणाऱ्या काही खेळाडूंवर कोणीही बोली लावली नाही. आश्चर्याची बाब म्हणजे फिरकीपटू पियुष चावलाला अनपेक्षित बोली लागली. त्याला चेन्नईच्या संघाने विकत घेतले. तिसऱ्या टप्प्यात भारतीय युवा खेळाडूंचा भरणा असला, तरी त्यांच्यावर बोली लावण्यात संघांनी फारसा रस दाखवला नाही. चौथ्या टप्प्यात धक्कादायकरित्या अनेक मोठ्या आणि नावाजलेल्या खेळाडूंना कोणीही वाली मिळाला नाही. मार्टिन गप्टिल, कार्लोस ब्रेथवेट, मुस्तफिजूर रहमान, बेन कटिंग यासारख्या अनेक खेळाडूंना खरेदी करण्यात कोणत्याही संघमालकाने रस दाखवला नाही. तर शेवटच्या टप्प्यात ताज्या यादीतील काही खेळाडूंसह पहिल्या फेरीत UNSOLD राहिलेल्या खेळाडूंनाही पुन्हा लिलावासाठी ठेवण्यात आले. त्यात काही खेळाडूंवर बोली लावण्यात आली.
अवश्य वाचा – IPL 2020 : जाणून घ्या लिलावानंतर दिल्ली कॅपिटल्सचा संपूर्ण संघ