IPL Schedule 2023: इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १६व्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) शुक्रवारी (१७ फेब्रुवारी) माहिती दिली की, पहिला सामना ३१ मार्च रोजी गतविजेता गुजरात टायटन्स आणि चार वेळचा विजेता चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. याचाच अर्थ युवा स्टार हार्दिक पांड्याला पहिल्याच सामन्यात अनुभवी महेंद्रसिंग धोनीचे आव्हान असेल. २८ मे रोजी अंतिम सामना होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

५२ दिवसांत १० संघांमध्ये ७० लीग सामने खेळवले जातील. त्यानंतर चार प्लेऑफ सामने खेळवले जातील. अशा प्रकारे या स्पर्धेत एकूण ७४ सामने होणार आहेत. १८ डबल हेडर असतील (एका दिवसात दोन सामने). सर्व सामने देशभरातील एकूण १२ मैदानांवर खेळवले जातील. साखळी फेरीत एक संघ आपल्या घरच्या मैदानावर सात सामने आणि विरोधी संघाच्या मैदानावर सात सामने खेळेल. गेल्या वेळी गुजरात टायटन्सने अंतिम फेरीत राजस्थान रॉयल्सचा पराभव करून विजेतेपद पटकावले होते. तो प्रथमच आयपीएलमध्ये खेळला. पहिल्याच प्रयत्नात तो यशस्वी झाला होता.

आयपीएल २०१९ नंतर प्रथमच सर्व संघांच्या घरच्या मैदानावर हा सामना खेळवला जाणार आहे. कोरोनाव्हायरस साथीच्या आजारामुळे २०२० मध्ये यूएईमध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्याच वेळी, २०२१ मध्ये भारतात काही मैदानांवर सामने खेळवले गेले होते, परंतु कोरोना महामारीमुळे ते मध्यभागी थांबवले गेले आणि यूएईमध्ये पूर्ण झाले. २०२२ मध्ये ही स्पर्धा संपूर्णपणे भारतात खेळली गेली, परंतु मुंबई-पुणे येथे लीग सामने आणि अहमदाबाद-कोलकता येथे प्लेऑफ सामने खेळले गेले.

सर्व १० संघ साखळीमध्ये १४-१४ सामने खेळावे लागतील

सर्व १० संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. ग्रुप स्टेजमध्ये प्रत्येक संघ १४-१४ सामने खेळेल. या दरम्यान, प्रत्येक संघाला त्यांच्या घरी ७ सामने खेळावे लागतील, तर उर्वरित ७ सामने विरोधी संघाच्या मैदानावर खेळावे लागतील. अशा प्रकारे प्रत्येक संघ ७ होम आणि ७ अवे सामने खेळेल.

आयपीएल २०२३

गट-अ: मुंबई इंडियन्स, कोलकाता नाइट रायडर्स, राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स, लखनौ सुपर जायंट्स.

गट-ब: चेन्नई सुपर किंग्ज, पंजाब किंग्ज, सनरायझर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, गुजरात टायटन्स.

हेही वाचा: IND vs AUS 2nd Test: नटखट अ‍ॅश अण्णा! नॅथन लायनला क्लीनबोल्ड करताच शमीसोबतची गोंडस कृती व्हायरल, पाहा Video

१० संघ एकूण ७० लीग सामने १२ ठिकाणी खेळतील

आयपीएल २०२३ मध्ये एकूण १२ सामने १२ ठिकाणी खेळवले जातील. यावेळी गुवाहाटी, धर्मशाला येथेही आयपीएल सामने आयोजित करण्याची संधी मिळणार आहे. यावेळी अहमदाबाद, मोहाली, लखनऊ, हैदराबाद, बंगळुरू, चेन्नई, दिल्ली, कोलकाता, जयपूर, मुंबई, गुवाहाटी, धर्मशाला या स्टेडियमवर सामने खेळवले जातील.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl schedule 2023 first match to be held on march 31 dhoni to face hardik final to be played on may 28 avw