आयपीएलमधील स्पॉट-फिक्सिंग प्रकरणी चौकशी सुरू असलेला चेन्नई सुपर किंग्जचा मुख्य कार्यकारी अधिकारी गुरुनाथ मयप्पनवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) क्रिकेटसंबंधित कोणत्याही उपक्रमांत सामील होण्यास मनाई करण्यात आली आहे.
बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांचा जावई मयप्पनला शुक्रवारी सट्टेबाजीप्रकरणी मुंबई पोलिसांनी अटक केली. यासंदर्भात बीसीसीआयचे सचिव संजय जगदाळे यांनी रविवारी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे की, ‘‘चेन्नई सुपर किंग्जच्या संघ व्यवस्थापनाचे सदस्य गुरुनाथ मयप्पनला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. बीसीसीआयने या गोष्टीची नोंद धेतली आहे. संघाचा अधिकृत अधिकारी असलेल्या मयप्पनसाठी आयपीएलचे नियम आणि बीसीसीआयची लाचलुचपत-विरोधी नियमावली बंधनकारक आहे.’’
या पत्रकात पुढे असे म्हटले आहे की, ‘‘मयप्पनची सध्या चौकशी सुरू आहे. बीसीसीआयची शिस्तपालन समिती किंवा आयपीएल आचारसंहित समितीने मयप्पनला क्रिकेटसंबंधित कोणतेही उपक्रम आणि चेन्नई सुपर किंग्जसंदर्भातील उपक्रमांमध्ये सहभागाबाबत मनाई करण्यात आली आहे.’’
जगदाळे यांनी सांगितले की, ‘‘बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी मुंबई पोलिस अधिकाऱ्यांशी २३ मे रोजी भेट घेऊन पोलिसांची चौकशी आणि तपासासाठी आम्ही सर्वतोपरी सहकार्य करू, असे आश्वासन दिले.’’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा