‘आयपीएल’मधील सट्टेबाजी प्रकरणाच्या मुद्गल समितीने सादर केलेल्या अहवालात आयसीसी अध्यक्ष व बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन, गुरुनाथ मयप्पन, राज कुंद्रा, सुंदर रमण यांची चौकशी केली असल्याचे शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केले. तसेच या चौघांसोबत आणखी तीन खेळाडूंचीही चौकशी करण्यात आली असल्याचे न्यायालयाने म्हटले. मात्र, या खेळाडूंच्या नावांबाबत अद्याप गुप्तता बाळगण्यात आली आहे.
एन.श्रीनिवासन, गुरूनाथ मयप्पन, राज कुंद्रा आणि सुंदर रमण यांची नावे उघड करण्यात आली असून या चौघांनाही मुद्गल समितीच्या अहवालावर आपली बाजू मांडण्याच्या सूचना सर्वोच्च न्यायालयाने दिल्या आहेत. या चौघांनाही मुद्गल समितीने सादर केलेल्या अहवालाची प्रत देण्यात आली असून अहवालातील मुद्द्यांवर श्रीनिवासन, मयप्पन, कुंद्रा आणि रमण यांना येत्या २४ नोव्हेंबरपूर्वी स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे. तसेच अहवालामध्ये आणखी तीन क्रिकेटपटूंच्याही नावाचा उल्लेख आहे. मात्र, प्रकरणाचे महत्त्व लक्षात घेऊन अद्यापतरी या क्रिकेटपटूंची नावे जाहीर करणे योग्य नसल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे.
‘विश्वचषक विजेत्या संघातील खेळाडूचे बुकींशी संबंध’
श्रीनिवास, मयप्पन, कुंद्रा आणि सुंदर रमण यांना देण्यात आलेल्या अहवालांच्या प्रतिंमध्ये देखील या तीन खेळाडूंच्या नावे गुप्त ठेवण्यात आली आहेत. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ‘बीसीसीआय’ने आपली २० नोव्हेंबर रोजी होणारी वार्षिक सभा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयानेही ‘बीसीसीआय’ला आपली वार्षिक निवडणूक आणखी पुढे ढकलण्याची सूचना केली आहे.
आयपीएल फिक्सिंग: मुद्गल समितीच्या अहवालातील चार नावे उघड
'आयपीएल'मधील सट्टेबाजी प्रकरणाच्या चौकशी अंतर्गत मुद्गल समितीच्या अहवालातील चार नावे शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने उघड केली. तर, उर्वरित नावांबाबत अद्याप गुप्तता बाळगण्यात आली आहे.
First published on: 14-11-2014 at 04:26 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl spot fixing case sc gives n srinivasan gurunath meiyappan raj kundra sundar raman till november 24 to reply