मुंबई पोलिसांनी विंदू दारासिंग आणि गुरुनाथ मय्यपनला चौकशीसाठी जेव्हा समोरासमोर आणले तेव्हा गुरुनाथने ‘तुने मुझे क्यो फसाया?’ असा हताश सवाल विंदूला केला. त्यावर ‘आय एम सॉरी ब्रदर.’ एवढेच त्रोटक उत्तर विंदूने दिले.गुरुनाथ आणि विंदू सध्या मुंबई पोलिसांच्या कोठडीत आहेत. विंदूने ज्या प्रकारे गुरुनाथला सट्टेबाजीच्या जाळ्यात ओढले ते पाहून पोलीसही हैराण झाले आहेत. गुरुनाथ मय्यपन हा चेन्नईतला व्यावसायिक. त्याची स्वत:ची एव्हीएम प्रॉडक्शन ही आघाडीची चित्रपट निर्मिती करणारी कंपनी आहे. शिवाजी हा त्याच्याच कंपनीचा सुपरहिट ठरलेला बिग बजेट चित्रपट. गेल्या वर्षी आयपीएलच्या उदघाटन सोहळ्यात विंदूने जाणीवपूर्वक गुरुनाथशी ओळख करवून घेतली होती. सध्या सुरू असलेल्या आयपीएल ६ मध्ये त्याने गुरुनाथला सट्टेबाजीसाठी प्रवृत्त केले होते. सुरवातीला विंदूने त्याला २५ लाख रुपयेजिंकवून दिले. मात्र नंतर गुरुनाथ हरत गेला. या मोसमात तो तब्बल १ कोटी रुपये हरला होता. एवढय़ा लवकर पोलिसांच्या जाळ्यात सापडून आपली ही अवस्था होईल, याची गुरुनाथला पुसटशीही कल्पना नव्हती. जेव्हा रविवारी दोघांना समोरामसोर आणले तेव्हा गुरुनाथने ‘तुने मुझे क्यो फसाया विंदू?’असा सवाल केला. त्यावर ‘आय एम सॉरी ब्रदर..’ एवढेच उत्तर विंदू देऊ शकला. विंदूने गुरुच्या नजरेला नजर भिडवली नव्हती. गुरुनाथला क्रिकेटचे फारसे ज्ञान नाही. तो चौकशी दरम्यान सारखा रडत असतो, असेही पोलिसांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा