चेन्नई सुपर किंग्ज संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुरुनाथ मयप्पन यांना अटक करण्यात आल्यामुळे आयपीएलमधून चेन्नई संघ हद्दपार करा, अशी मागणी आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांनी केली आहे. ‘‘संघाचा मालक जर सट्टेबाजीमध्ये अडकला असेल तर संघाचा करार तात्काळ रद्द करण्यात यावा. तसेच चेन्नई संघ काढून टाकून त्यांच्या जागी नव्याने लिलाव करण्यात यावा. सट्टेबाजी हे आयपीएल आचारसंहितेत बसत नाही. मयप्पन हा चेन्नई संघाचा मालकच आहे. मी आयपीएलचा अध्यक्ष असताना, मालक म्हणून मेयप्पनच्या नावाने अनेक पासेस मी दिले आहेत. आता आयपीएलमधील सर्व मालकांनी एकत्र येऊन ही स्पर्धा पुढे चालवायला हवी. बीसीसीआय किंवा आयपीएलचे पदाधिकारी आपल्या हक्कांचा गैरवापर करत असतील, त्यांच्याविरोधात संघमालकांनी न्यायालयात दाद मागायला हवी,’’ असेही मोदी यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा