आयपील फ्रेंचायझी सनरायझर्स हैदराबादने माजी क्रिकेटपटू ब्रायन लारा यांना संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्त केलं आहे. लारा यांच्याआधी टॉम मुडी यांनी संघाला प्रशिक्षण दिलेलं आहे. आयपीएल २०२२ हंगामात समनरायझर्स हैदराबाद संघाने चांगली कामगिरी केली नव्हती. याच कारणामुळे टॉम मुंडी यांच्या जागेवर ब्रायन लारा यांना मुख्य प्रशिक्षक म्हणून नेमण्यात आल्याचं म्हटलं जातंय.

हेही वाचा >>> Asia Cup: ‘जागतिकEक्रिकेटमध्ये भारत लाडका कारण…’ मोहम्मद हाफीज स्पष्टच बोलला

टॉम मुडी यांनी २०२२ च्या आयपीएल हंगामात सनरायझर्स हैदराबाद संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून जबाबदारी पार पडली. मात्र या हंगामात संघ चांगली कामगिरी करू शकला नाही. उलट विजयापेक्षा हैदराबादला बहुतेक सामन्यांत पराभवाचाच सामना करावा लागला. परिणामी हा संघ गुणतालिकेत आठव्या स्थानी होता. त्यानंतर आता आगामी हंगामासाठी हैदराबाद फ्रेंचायझीने संघाचा प्रशिक्षक बदलण्याचा निर्णय घेतला असून ब्रायन लारा यांची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी ब्रायन लारा सनरायझर्स हैदराबाद संघाच्या प्रशिक्षक चमूतील एक सदस्य होते.

हेही वाचा >>> अनुष्का शर्माच्या फोटोवर केलेल्या ‘त्या’ कमेंटमुळे डेव्हिड वॉर्नर ट्रोलर्सच्या निशाण्यावर; विराट कोहली म्हणाला…

दरम्यान, टॉम मुडी मुख्य प्रशिक्षक असताना हैदराबाद संघाने २०१३ ते २०१९ या कालावधित चांगली कामगिरी केली होती. मुडी यांच्याच कार्यकाळात २०१६ सालच्या हंगामात हैदराबादने जेतेपद पटकावले होते. त्यानंतर एका हंगामात हैदराबाद संघ अंतिम लढतीपर्यंत पोहोचला होता. २०२१ साली टॉम मुडी यांची संघाचे डायरेक्टर ऑफ क्रिकेटपदी नियुक्ती करण्यात आली होती. या काळात ट्रेव्हर बेलीस यांच्याकडे मुख्य प्रशिक्षकपद सोपवण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा २०२२ साली मुडी यांनी मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं.

Story img Loader