Delhi Capitals Players Material Theft: आयपीएल २०२३ मध्ये, सर्वात वाईट स्थितीत असलेल्या दिल्ली कॅपिटल्सशी संबंधित एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाच्या फलंदाजांची बॅट, पॅड, हातमोजे आणि शूजही चोरीला गेले आहेत. याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे, मात्र सर्वात धक्कादायक बाब म्हणजे विदेशी खेळाडूंच्या बॅटचीही चोरी झाली असून, प्रत्येक बॅटची किंमत एक लाख रुपयांपर्यंत आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या सुमारे अर्धा डझन फलंदाजांच्या १६ बॅट्स चोरीला गेल्या आहेत.

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, बंगळुरूमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध सामना खेळल्यानंतर जेव्हा दिल्ली कॅपिटल्सचे खेळाडू दिल्लीला पोहोचले. त्यानंतर त्यांच्या किट बॅग त्यांच्यापर्यंत पोहोचल्या, तेव्हा त्यांना धक्काच बसला. कर्णधार डेव्हिड वॉर्नरच्या ३ बॅट्स, मिचेल मार्शच्या २ बॅट्स, फिल सॉल्टच्या ३ आणि यश धुलच्या ५ बॅट्स चोरीला गेल्या आहेत. याशिवाय काहींचे पॅड, काहींचे ग्लब्ज, काहींचे शूज आणि क्रिकेटचे इतर साहित्य दिल्लीत पोहोचले नाही, याला नक्कीच चोरी म्हणावे लागेल.

Sachin Tendulkar Cryptic post about Steve Bucknor
Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकरच्या ‘त्या’ पोस्टने चाहत्यांच्या वाईट आठवणी झाल्या ताज्या, ‘हा’ अनुभवी अंपायर पुन्हा आला चर्चेत
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Sanju Samsons six hits fan
Ind vs SA: संजू सॅमसनच्या षटकाराने चाहती घायाळ
Tilak Verma becomes 2nd youngest player to score a T20I century for India
Tilak Verma : तिलक वर्माने वादळी शतक झळकावत घडवला इतिहास, भारतासाठी ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला दुसरा खेळाडू
Sanju Samson broke Yusuf Pathan's 15-year-old record
IND vs SA : संजू सॅमसनने सलग दोन शतकांनंतर केला नकोसा विक्रम, ‘या’ बाबतीत युसूफ-रोहितला टाकले मागे
India wicketkeeper batsman Sanju Samson expressed his feelings about the comeback sport news
अपयशानंतर स्वत:च्याच क्षमतेवर प्रश्न! कर्णधार, प्रशिक्षकांच्या पाठिंब्यामुळे बळ; विक्रमवीर सॅमसनची भावना
Sanju Samson Revelas Suryakumar Yadav and Gautam Gambhir Support him
Sanju Samson : ‘कारकीर्दीत बरेच चढ-उतार आले, पण…’, शतकी खेळीनंतर संजू सॅमसनने ‘या’ दोन माणसांचे मानले आभार

हेही वाचा – IPL 2023 MI vs SRH: पहिल्या विकेटनंतर अर्जुनने व्यक्त केल्या भावना, सामन्यानंतर मुंबईच्या रणनीतीबद्दल केला खुलासा

मात्र, दिल्ली कॅपिटल्स फ्रँचायझीने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. दिल्ली कॅपिटल्सने मंगळवारी सराव सत्र आयोजित केले. काही फलंदाजांनी त्यांच्या एजंटशी संपर्क साधला आणि त्यांच्या बॅट कंपन्यांना पुढील सामन्यापूर्वी काही बॅट पाठवण्याची विनंती केली. परदेशी खेळाडूंना त्यांच्यासारखी बॅट एवढ्या लवकर मिळणे अवघड आहे, पण विदेशी बॅट बनवणाऱ्या कंपन्याही भारतात आहेत. त्यामुळे त्यांना येथे बॅट मिळू शकतात, त्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

हेही वाचा – MI vs SRH: सचिनपेक्षा अर्जुन तेंडुलकर ठरला सरस, IPL मध्ये करून दाखवली ‘ही’ कमाल

दिल्ली कॅपिटल्सच्या एका सूत्राने सांगितले की, “प्रत्येकाच्या किट बॅगमधून काहीतरी गहाळ झाल्याचे ऐकून त्यांना धक्का बसला. अशी घटना पहिल्यांदाच घडली असून लवकरच हे प्रकरण लॉजिस्टिक विभाग, पोलिस आणि नंतर विमानतळ प्राधिकरणाकडे नेण्यात आले. तपास सुरू आहे.” खेळाडू येण्यापूर्वी त्यांचे सामान त्यांच्या हॉटेलच्या खोलीबाहेर पोहोचेल याची खात्री करण्यासाठी आयपीएल संघ एका लॉजिस्टिक कंपनीला कामावर घेतात. इथेही तेच घडले, पण किट बॅगमधून बॅट आणि इतर काही वस्तू चोरीला गेल्या आहेत.