Sachin Tendulkar and Shubman Gill Photo Viral: आयपीएल २०२३ मधील दुसरा क्वालिफायर सामना नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद येथे पार पडला. या सामन्यात गुजरातने मुंबईचा ६२ धावांनी पराभव केला. या विजयानंतर गुजरात टायटन्सने अंतिम फेरीत धडक मारली आहे. त्याचबरोबर मुंबई इंडियन्स प्लेऑफमधून बाहेर पडला आहे. दुसऱ्या क्वालिफायर सामन्यानंतर सचिन तेंडुलकर आणि शुबमन गिलचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दोन्ही खेळाडू एकमेकांशी चर्चा करताना दिसत आहेत.

भारतीय क्रिकेटचा पुढचा सुपरस्टार खेळाडू म्हणून शुबमन गिलने आपली पावले पुढे टाकण्यास सुरुवात केली आहे. आयपीएलच्या १६व्या हंगामात गिलने आपल्या बॅटने तो पराक्रम करून दाखवला, जो रोहित शर्मालाही आजतागायत करता आलेला नाही. विराट कोहलीनंतर गिल एका मोसमात सर्वाधिक शतके करणारा दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. या मोसमात आतापर्यंत शुबमन गिलच्या बॅटने ३ शतकी खेळी केली आहेत.

Suryakumar Yadav Speech in dressing room video
Suryakumar Yadav : ‘आता सगळ्यांनी मायदेशात जाऊन…’, दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका जिंकल्यानंतर सूर्याने संघाला दिला महत्त्वाचा सल्ला
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Sanju Samson Tilak Varma Smash World Record in Johannesburg with Fiery Centuries in T20I IND vs SA
IND vs SA: तिलक वर्मा-संजू सॅमसनचे ‘वर्ल्ड रेकॉर्ड’, जोहान्सबर्गमध्ये लावली विक्रमांची चळत; वाचा १० अनोखे विक्रम
India Scored 2nd Highest T20 Total of 283 Runs Tilak Varma and Sanju Samson Scored Individual Centuries with Record Breaking Partnership IND vs SA
IND vs SA: टीम इंडियाचा धावांचा पर्वत, संजू-तिलकची शतकं आणि विक्रमी भागीदारी
Tilak Varma Statement on Maiden T20I Century Flying Kiss Celebration He Said It is For Suryakumar Yadav Gives credit to him IND vs SA
IND vs SA: तिलक वर्माने शतकानंतर कोणाला फ्लाईंग किस दिला? सामन्यानंतर स्वत:च सांगितलं…
Arjun Tendulkar Maiden Five Wicket Haul in First Class Cricket Ranji Trophy Goa vs Arunachal Pradesh
Arjun Tendulkar: अर्जुन तेंडुलकरने पहिल्यांदाच पटकावल्या ५ विकेट्स; रणजी करंडक स्पर्धेत भेदक गोलंदाजी; ८४ धावांवर संघ सर्वबाद
Afghanistan Batter Rahmanullah Gurbaj Surpasses Virat Kohli in Youngest to 8 Hundreds in Mens ODI Equals Sachin Tendulkar Record
AFG vs BAN: अफगाणिस्तानच्या फलंदाजाची ऐतिहासिक कामगिरी, विराट कोहलीला मागे टाकलं तर सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची केली बरोबरी

मुंबई विरुद्धच्या दुस-या क्वालिफायर सामन्यात, १२९ धावांच्या शानदार खेळीनंतर गिल मुंबई इंडियन्स संघाचा मार्गदर्शक सचिन तेंडुलकरशी बोलताना दिसला. गिल आणि सचिन यांच्यातील या संवादाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. यावर चाहते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.

आयपीएल प्लेऑफमधील सर्वोच्च धावसंख्या –

१२९ धावा – गिल विरुद्ध एमआय
१२२ धावा – सेहवाग विरुद्ध सीएसके
११७* धावा – वॉटसन विरुद्ध एसआरएच
११५* धावा – साहा विरुद्ध केकेआर

आयपीएलच्या एका मोसमात ८०० हून अधिक धावा –

विराट कोहली (२०१६)
डेव्हिड वॉर्नर (२०१६)
जोस बटलर (२०२२)
शुबमन गिल (२०२३)

आयपीएलच्या एका मोसमात सर्वाधिक धावा –

९७३ धावा – विराट कोहली (आरसीबी, २०१६)
८६३ धावा – जोस बटलर (आरआर, २०२२)
८५१ धावा – शुबमन गिल (जीटी, २०२३)
८४८ धावा – डेव्हिड वॉर्नर (एसआरएच, २०१६)
७३५ धावा – केन विल्यमसन (एसआरएच, २०१८)

आयपीएल प्लेऑफमध्ये एकाच सामन्यात सर्वाधिक षटकार –

१० – शुबमन गिल (जीटी) विरुद्ध एआय, अहमदाबाद, २०२३ क्वालिफायर-२
८ – वृद्धीमान साहा (पीबीकेएस) विरुद्ध केकेआर, बंगळुरू, २०१४ फायनल
८ – ख्रिस गेल (आरसीबी) विरुद्ध एसआरएच, बंगळुरू, २०१६ फायनल
८ – वीरेंद्र सेहवाग (पीबीकेएस) विरुद्ध सीएसके, मुंबई , २०१४ क्वालिफायर -२
८ – शेन वॉटसन (सीएसके) विरुद्ध एसआरएच, मुंबई , २०१८ फायनल