R Ashwin’s dismissal makes daughter emotional: आयपीएल २०२३ च्या ३२ व्या सामन्यात, राजस्थान रॉयल्सला आरसीबीविरुद्ध ७ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात राजस्थानला १९० धावांचे लक्ष्य मिळाले होते. पहिल्याच षटकात जोस बटलर बाद झाल्याने संघाची सुरुवात काही खास झाली नव्हती. यानंतर देवदत्त पडिकल आणि यशस्वी जैस्वाल यांनी डाव सांभाळण्याचे काम केले, परंतु हे दोघेही बाद होताच राजस्थानचा डाव गडबडला होता, मात्र शेवटी रविचंद्रन अश्विनने काही आकर्षक फटके मारत संघाच्या आशा जिवंत ठेवल्या.

अश्विन बाद झाल्याने त्याची मुलगी झाली भावूक –

राजस्थानला शेवटच्या षटकात विजयासाठी २० धावांची गरज होती. अश्विन क्रीजवर हर्षल पटेलचा सामना करत होता. यादरम्यान अश्विनने पहिल्या तीन चेंडूत १० धावा करत सामना रोमांचक केला. चौथ्या चेंडूवरही अश्विनने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, पण तो यशस्वी होऊ शकला नाही आणि तो बाद झाला. यादरम्यान स्टेडियममध्ये सामना पाहण्यासाठी आलेली अश्विनची मुलगी आपल्या वडिलांना बाद झालेली पाहून भावूक झाली आणि तिच्या डोळ्यात अश्रू तरळले. वडिल बाद झाल्यानंतर अश्विनची मुलगी भावूक होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी लखनऊविरुद्धच्या सामन्यात ती भावूक झाली होती.

Aata Hou De Dhingana Season 3
Video: ‘आता होऊ दे धिंगाणा ३’च्या मंचावर अद्वैतने कलासाठी आणली सवत; पतीला जिंकण्यासाठी कला लावतेय ताकद…; व्हिडीओ व्हायरल
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
IND vs IRE Smriti Mandhana and Pratika Rawal 233 run partnership broke a 20 year old record against Ireland
IND vs IRE : स्मृती-प्रतिकाच्या द्विशतकी भागीदारीने केला मोठा पराक्रम! मोडला २० वर्षांपूर्वीचा ‘हा’ खास विक्रम
Pratika Rawal Maiden ODI Century in INDW vs IREW New India Opener After Continues Fifties
INDW vs IREW: टीम इंडियाची युवा सलामीवीर प्रतिका रावलचं पहिलं वनडे शतक, भारतीय अंपायरच्या लेकीची धमाकेदार खेळी
Shiva
Video: “माझा होकार…”, आशूने नेहाबरोबरच्या लग्नासाठी दिला होकार; ‘शिवा’ मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो
akshay kumar filing kite with paresh rawal
Video : ‘भूत बंगला’च्या सेटवर अक्षय कुमारने उडवली पतंग; तर परेश रावल यांनी धरली फिरकी, व्हायरल झाला व्हिडीओ
Lakhat Ek Aamcha Dada
Video: ‘लाखात एक आमचा दादा’मध्ये मारामारीच्या सीनचे ‘असे’ झाले शूटिंग; पाहा व्हिडीओ
Shiva
Video : “तू दे होकार, मला तेच…”, आशूची नाराजी दूर करण्याची शिवाची हटके स्टाईल; मालिकेत पुढे काय होणार?

राजस्थान रॉयल्सचा सलग दुसरा पराभव –

अश्विन बाद होताच राजस्थानच्या सामन्यातील विजयाच्या सर्व शक्यता संपुष्टात आल्या. यानंतर राजस्थानला तीन चेंडूत फक्त दोन धावा करता आल्या. त्यामुळे आरसीबीने हा सामना ७ धावांनी जिंकला. अशाप्रकारे राजस्थान रॉयल्सला स्पर्धेत सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले.

हेही वाचा – VIDEO: विराट-अनुष्काने जिममध्ये पंजाबी गाण्यावर केला डान्स, व्हिडिओच्या शेवटच्या भागाने चाहत्यांची वाढली चिंता

आरसीबीसाठी मॅक्सवेल आणि प्लेसिसने झळकावले झंझावाती अर्धशतक –

राजस्थानविरुद्धच्या या सामन्यात ग्लेन मॅक्सवेल आणि फाफ डू प्लेसिस यांनी आरसीबीसाठी धडाकेबाज अर्धशतकी खेळी खेळली. ग्लेन मॅक्सवेलने संघासाठी ४४ चेंडूत ७७ धावांची दमदार खेळी केली. या खेळीत त्याने ६ चौकार आणि ४ उत्कृष्ट षटकारही मारले. त्याचबरोबर फाफ डू प्लेसिसने ३९ चेंडूत ६२ धावा केल्या. या खेळीदरम्यान त्याने ८ चौकार आणि २ षटकारही मारले. त्याचवेळी राजस्थानविरुद्धच्या सामन्यात आरसीबीचे कर्णधार विराट कोहली पहिल्याच षटकात एकही धाव न देता बाद झाला. असे असतानाही संघाने स्पर्धेत सलग दुसरा विजय नोंदवला.

Story img Loader