Shubman Gill and Ishan Kishan escaping injury: २५ एप्रिल रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे. या सामन्यापूर्वी दोन्ही संघ सराव करत होते आणि याच दरम्यान मुंबई इंडियन्सचा इशान किशन आणि गुजरात टायटन्सचा शुबमन गिल यांच्यावरील मोठा अपघात टळला. वास्तविक, दोन्ही खेळाडूंना चेंडू लागणार होता, पण शेवटच्या क्षणी दोघेही त्या ठिकाणाहून दूर गेले. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

इशान आणि गिल थोडक्यात बचावले –

गुजरात टायटन्सच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की दोन्ही खेळाडू सरावानंतर परतत आहेत, त्याच दरम्यान एक चेंडू वेगाने येतो आणि दोन्ही खेळाडूंच्या अगदी जवळ पडतो. मात्र, चेंडू पडण्यापूर्वीच दोन्ही खेळाडू सावध होऊन चेंडूपासून दूर होतात.

IND vs IRE Smriti Mandhana and Pratika Rawal 233 run partnership broke a 20 year old record against Ireland
IND vs IRE : स्मृती-प्रतिकाच्या द्विशतकी भागीदारीने केला मोठा पराक्रम! मोडला २० वर्षांपूर्वीचा ‘हा’ खास विक्रम
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Heinrich Klaasen hit maximum six ball gone out of stadium video viral in SAT20 2025
SA20 2025 : हेनरिक क्लासेनने मारला गगनचुंबी षटकार! चेंडू थेट स्टेडिमयच्या बाहेर रस्त्यावर पडला, अन् चाहत्याने…
Shiva
Video: “माझा होकार…”, आशूने नेहाबरोबरच्या लग्नासाठी दिला होकार; ‘शिवा’ मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो
akshay kumar filing kite with paresh rawal
Video : ‘भूत बंगला’च्या सेटवर अक्षय कुमारने उडवली पतंग; तर परेश रावल यांनी धरली फिरकी, व्हायरल झाला व्हिडीओ
BPL 2025 Mohammad Nawaz and Tanzim Hasan fight during Khulna Tigers vs Sylhet Strikers match
BPL 2025 : लाइव्ह मॅचमध्ये बांगलादेश आणि पाकिस्तानच्या खेळाडूंमध्ये जुंपली, वाद घालतानाचा VIDEO व्हायरल
IPL 2025 Time Table
IPL 2025 : ठरलं! ‘या’ दिवसापासून रंगणार आयपीएलचा थरार, पहिला सामना ‘या’ तारखेला होणार
BPL 2025 Mahedi Hasan obstructing the field wicket
BPL 2025 : फिल्डरने सोडला कॅच… तरीही केलं अपील, अंपायरने फलंदाजाला दिलं आऊट, VIDEO होतोय व्हायरल

यानंतर शुभमन गिल इशान किशनला म्हणतो, ‘बॉल पाहिला नाही का?’ यावर इशान किशन म्हणतो, ‘तुला बॉल दिसला नाही, तर तू का घाबरलास? हा व्हिडीओ पाहून समजू शकतो की, मोठी दुर्घटना टळली आहे. चेंडू कोणत्याही खेळाडूला लागून तो जखमी होऊ शकला असता.

हेही वाचा – IPL 2023: रिंकू सिंगने इन्स्टाग्रामवर लाइव्ह व्हिडीओदरम्यान विराट कोहलीची केली मिमिक्री, शुबमनला आवरलं नाही हसू, पाहा VIDEO

आयपीएल २०२३ मध्ये गिल आणि इशानने केलेली आतापर्यंतची कामगिरी –

गुजरात टायटन्सचा सलामीवीर शुबमन गिलने आयपीएल २०२३ मध्ये आतापर्यंत एकूण ६ डाव खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने ३८ च्या सरासरीने आणि १३८.१८च्या स्ट्राइक रेटने २२८ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून २ अर्धशतके झळकली आहेत. त्याचबरोबर, इशान किशनने देखील आतापर्यंत एकूण ६ डाव खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने २६.३३ च्या सरासरीने आणि १४१.६७ च्या स्ट्राइक रेटने १७० धावा केल्या आहेत. आतापर्यंत त्याने अर्धशतक झळकावले आहे.

Story img Loader