Virat Kohli and Anushka Sharma Video: आयपीएल २०२३ मधील ४३व्या सामन्यात आरसीबी आणि एलएसजी संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात विराट कोहली आणि लखनऊच्या खेळाडूंमध्ये वादावादी झाली. तसेच या सामन्यानंतर विराटची गौतम गंभीरशीही बाचाबाची झाली. त्यामुळे दोन दिवसांपासून गंभीर आणि कोहलीचे नाव चर्चेत आहे. अशात आता विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्माचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये विराट आणि अनुष्का एका मंदिरात गेल्याचे दिसत आहेत.
वास्तविक, नुकतीच अनुष्का शर्मा विराट कोहलीच्या टीमला सपोर्ट करण्यासाठी लखनऊला पोहोचली होती. यानंतर आता विराट कोहली आणि अनुष्का शर्माचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. अनुष्का शर्मा आणि विराट कोहली पुन्हा एकदा मंदिरात दर्शनासाठी आले आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सध्या हा व्हिडिओ कुठला आहे, हे सांगणे कठीण आहे. या व्हिडीओमध्ये विराट आणि अनुष्का एका मंदिरात दर्शन घेताना दिसत आहे. यावेळी कोहली धोतर परिधान केले आहे.
याआधीही हे जोडपे नैनीतालच्या नीम करोली बाबाच्या दरबारात गेले होते. यानंतर दोघांना वृंदावनातील दुसऱ्या मंदिरातही पाहिले होते. तसेच मध्य प्रदेशातील उज्जैन येथील प्रतिष्ठित महाकालेश्वर मंदिरातही गेले होते, तेथे दोघांनी दर्शन घेतले.
दुसरीकडे, विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचा आणखी एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दोघे कारच्या आत दिसत आहेत. हा फोटो विराट कोहलीने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. जे दिल्लीतील आहे, जिथे आरसीबी दिल्लीविरुद्ध त्यांचा पुढचा सामना खेळणार आहे. अनुष्का अनेकदा आरसीबीच्या सामन्याच्या ठिकाणी असते यादरम्यान ती आरसीबी आणि विराट कोहलीला सपोर्ट करताना दिसत असते.
हेही वाचा – मोहम्मद शमीच्या अडचणीत वाढ; पत्नी हसीन जहाँने गंभीर आरोप करत सर्वोच्च न्यायालयात घेतली धाव
कोणाला किती दंड ठोठावला?
विराट कोहली, गौतम गंभीर आणि नवीन-उल-हक यांच्यातील जोरदार वादाची दखल घेत बीसीसीआयने दोघांना दंड ठोठावला आहे. बोर्डाने विराट कोहलीला १०० टक्के मॅच फी म्हणजेच १.०७ कोटी रुपये, गौतम गंभीरला १०० टक्के मॅच फी म्हणजेच २५ लाख रुपये आणि नवीन-उल-हकला ५० टक्के मॅच फी म्हणजेच १.७९ लाख रुपये दंड ठोठावला आहे. या तिघांनीही आयपीएल आचारसंहितेच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा गुन्हा मान्य केला आहे. त्यामुळे या प्रकरणावर पुढील सुनावणी होणार नाही.