Gautam Gambhir Viral Video: आयपीएल २०२३ चा ५८ वा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात खेळला गेला. ज्यामध्ये घरच्या मैदानावर हैदराबद संघाला ७ विकेटने पराभवाचा सामना करावा लागला. सामन्याच्या सुरूवातीस, लखनऊ संघाचा मार्गदर्शक गौतम गंभीरसमोर चाहत्यांनी विराट कोहलीच्या नावाच्या घोषणा दिल्या, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

खरं तर, या व्हिडिओमध्ये, जेव्हा गौतम गंभीर आपल्या सहकारी स्टाफ सदस्यासह मैदानाची पाहणी करून परत येत होता, तेव्हा चाहत्यांनी त्याला पाहताच कोहली-कोहलीच्या घोषणा देण्यास सुरुवात केली. तथापि, चाहत्यांच्या या कृत्याला गंभीरने प्रतिसाद दिला नाही आणि शांतपणे ड्रेसिंग रूमकडे गेला. चाहत्यांनी गंभीरसमोर कोहली-कोहलीची घोषणा प्रथमच देण्या आल्या नाहीत. यापूर्वीही, कोहली-कोहलीच्या घोषणेसह गंभीरला डिवचण्याचे चाहत्यांचे बरेच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. एका व्हिडिओमध्ये, गंभीर चाहत्यांकडे रागाने पाहतानाही दिसला होता.

तसेच १ मे रोजी आरसीबी आणि एलएसजी दरम्यान सामना खेळल्यानंतर, जेव्हा विराट कोहली आणि काइल आपापसात बोलत होते, तेव्हा गंभीरने काइलला कोहलीशी बोलण्यापासून रोखले, त्यानंतर दोन्ही भारतीय खेळाडूमध्ये वादावादी पाहिला मिळाले. त्यानंतर संघर्ष इतका वाढला होता की उर्वरित खेळाडूंनी मध्यस्थी करुन प्रकरण शांत करावे लागले होते.

या सामन्यात पहिल्या डावाचे १९ षटक टाकण्यासाठी आवेश खान आला होता. आवेश खानने अब्दुल समदला टाकलेला तिसरा चेंडू कंबरेच्या वरच होता. त्यामुळे मैदानी पंचांनी हा नो बॉल घोषित केला. त्यानंतर लखनऊने या चेंडूबाबत रिव्ह्यू घेतला आणि तिसऱ्या पंचांनी तो चेंडू वैध असल्याचे सांगितले. त्यानंतर समद नाराज दिसला. या निर्णयावर प्रेक्षकही नाराज दिसले. दरम्यान काही प्रेक्षकांनी लखनऊ सुपरजायंट्सच्या डगआऊटच्या दिशेने नट आणि बोल्ट फेकले.

हेही वाचा – PBKS vs DC: हरप्रीत ब्रारच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर पंजाबचा दिल्लीवर ३१ धावांनी विजय, डेव्हिड वार्नरचे अर्धशतक ठरले व्यर्थ

त्याच वेळी, या सामन्यात एसआरएचने प्रथम फलंदाजी केली आणि हेन्रिक क्लासेन (४७) आणि अब्दुल समद (३७) यांच्या मदतीने ६ गडी गमावून १८२ धावा केल्या. प्रत्युत्तरात लखनऊ संघाने प्रेरणादायक मंकड (६४), मार्कस स्टोइनिस (४०) आणि निकोलस पुरन (४४) यांनी खेळलेल्या महत्त्वपूर्ण खेळीमुळे १९.२ षटकांत १८५ धावा करत सात विकेट्सने विजय मिळवला.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A video of virat kohlis name in front of gautam gambhir in hyderabad and lucknow match vbm