Harry Brook Out Of Form In IPL 2023 : आयपीएल २०२३ मध्ये अनेक नवीन खेळाडूंना संधी मिळाली आहे. इंग्लंडचा धाकड फलंदाज हॅरी ब्रूकने आंतरराष्ट्रीय स्तरावर अप्रतिम फंलदाजी करून क्रीडाविश्वात वेगळा ठसा उमटवला आहे. परंतु, आयपीएलमध्ये पदार्पण केल्यापासून आतापर्यंत हॅरीला चमकदार कामगिरी करता आली नाहीय. त्याच्या खराब प्रदर्शनामुळं भारताचा माजी खेळाडू आकाश चोप्राने प्रतिक्रिया दिली आहे.सनरायझर्स हैद्राबादने मागील सामन्यात विजयाचा खाता उघडला आणि आज त्यांचा सामना कोलकाता नाईट रायडर्सशी होणार आहे.

फ्रॅंचायजीने इंग्लिश फलंदाजाला १३.२५ कोटी रुपयांमध्ये खरेदी केलं होतं. पंरतु, तो आतापर्यंत संघर्ष करतानाच दिसत आहे. त्याने तीन इनिंगमध्ये फक्त २९ धावाच केल्या आहेत. आकाश चोप्राने यूट्यूब चॅनेलवर चर्चा करताना म्हटलं, हॅरी ब्रूक आतापर्यंत चांगली कामगिरी करू शकला नाही. फलंदाजीमध्ये खूप समस्या दिसून येत आहेत. हॅरी ब्रूकच्या रुपात एका महागड्या खेळाडूला खरेदी केलं, पंरतु, त्याला अजूनही हॅरी पॉटरची जादूची काठी मिळाली नाही. फिरकीपटूंच्या गोलंदाजीवर त्याला खूप समस्यांना सामोरं जावं लागतं.

raja hindustani budget and box office collection
फक्त ६ कोटींचे बजेट असलेल्या सिनेमाने कमावलेले ७६ कोटी, तुम्ही पाहिलाय का २८ वर्षांपूर्वीचा ‘हा’ सुपरहिट चित्रपट?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
gold prices dropping post Diwali it will reach 70000 per 10 grams soon
सोन्याचे दर ७० हजारांपर्यंत येणार? आणखी मोठी घसरण…
Wasim Akram's cat haircut bill 1000 Australian Dollars
Wasim Akram : तब्बल ५५ हजारात कापले मांजरीचे केस! बिल पाहून वसीम अक्रम चकित; म्हणाला, ‘इतक्या पैशात तर पाकिस्तानात…’, पाहा VIDEO
Gold prices at lows Big fall after Diwali
सुवर्णवार्ता… सोन्याचे दर निच्चांकीवर… दिवाळीनंतर मोठी घसरण…
MS Dhoni impressed by Mumbai Ayush Mhatre
MS Dhoni : मुंबईच्या १७ वर्षीय फलंदाजाने जिंकले माहीचे मन, IPL 2025 च्या लिलावापूर्वी CSK ने दिली ‘ही’ खास ऑफर
shaktimaan arriving soon mukesh khanna
भारताचा पहिला सुपरहीरो ‘शक्तिमान’ पुन्हा येतोय प्रेक्षकांच्या भेटीला; कोण साकारणार मुख्य भूमिका? जाणून घ्या
7 year old boy drew a picture of Dhananjay Powar on his hand
७ वर्षांच्या मुलाने धनंजय पोवारचं हातावर काढलं चित्र, आई डीपीला फोटो पाठवून म्हणाली, “दादा काय जादू केली…”

नक्की वाचा – खराब फॉर्ममुळं KKR आंद्रे रसेलला ड्रॉप करणार? माजी कर्णधाराने दिली मोठी प्रतिक्रिया, म्हणाला…

मयंक अग्रवाल चांगल्या फॉर्ममध्ये नाही – आकाश चोप्रा

आकाश चौप्राने हैद्राबादच्या अन्य खेळाडूंवरही प्रतिक्रिया दिली. चोप्राने म्हटलं, मयंक अग्रवाल खराब फॉर्ममध्ये आहे. तर कर्णधार एडन मार्करम लेफ्ट आर्म स्पिन गोलंदाजीसमोर धावांसाठी संघर्ष करताना दिसत आहे. मयंक अग्रवाल चांगल्या फॉर्ममध्ये नाहीय. राहुल त्रिपाठी चांगला खेळत आहे, पण त्यानंतर एडन मार्करम फलंदाजीसाठी उतरतो. लेफ्ट आर्म स्पिनसमोर त्याचे आकडे खूप साधारण आहेत. त्यानंतर हेनरिक क्लासेनचा नंबर आहे. त्याला फिरकी गोलंदाजीवर खेळता येतो, पण तो खूप खालच्या नंबरवर फलंदाजी करतो. त्यानंतर तुम्ही वॉशिंगटन सुंदर आणि अब्दुल समदला खेळताना पाहत असाल.