आयपीएलचे पंधरावे पर्व शेवटच्या टप्प्यात आहे. यावेळी बॉलिवूड सेलिब्रिटींपासून ते वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गजांनी सामन्यांना हजेरी लावली. या दिग्गजांची काही काळासाठी चर्चादेखील झाली. आता मात्र अभिनेता आमिर खान चर्चेत आला आहे. तो एका व्हिडीओमध्ये क्रिकेटचा सराव करताना दिसत असून त्याने थेट आयपीएलमध्ये खेळण्यासाठी संधी मिळेल का अशी विचारणा केली आहे. त्याच्या प्रश्नालाही भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मजेशीर उत्तर दिले आहे.

हेही वाचा >>> IPLच्या अंतिम सामन्याआधी रंगणार समारोप सोहळा; दिग्गज बॉलिवूड सेलिब्रिटी होणार सहभागी

आमिर खान एका व्हिडीओमध्ये नेटमध्ये क्रिकेटची प्रॅक्टिस करताना दिसत आहे. हा व्हिडीओ स्टार स्पोर्ट या क्रीडाविषयक चॅनेलने समाजमाध्यमावर टाकला आहे. या व्हिडीओमध्ये आमिर खान नेटमध्ये सराव करताना दिसतोय. सराव करतानाच त्याने मला आयपीएलमध्ये संधी मिळेल का? अशी विचारणा केली आहे. त्याच्या उत्तराला रवी शास्त्रींनी उत्तर दिलंय.

हेही वाचा >>> सुवर्णपदकाच्या कमाईनंतर निखत झरीनवर कौतुकाचा वर्षाव; आनंद महिंद्रा यांनीही खास ट्विट करत केले अभिनंदन, म्हणाले…

आमिर खानच्या या प्रश्नाचे उत्तर देताना फुटवर्कवर काम करण्याची गरज असल्याचे रवी शास्त्रींनी म्हटलंय. “आमिर खान नेटमध्ये चांगला सराव करताना दिसतोय. मात्र फुटवर्कवर त्याला आणखी काम गरण्याची गरज आहे. त्याला कोणत्याही टीममध्ये संधी दिली मिळू शकते,” असे मिश्किलपणे रवी शास्त्री यांनी म्हटले आहे.

हेही वाचा >>> जोराचा फटका मारताना पांड्याच्या हातातून निसटली बॅट, पंच बालंबाल बचावला, पाहा नेमकं काय घडलं?

तसेच रवी शास्त्रींच्या या टिप्पणीचेही आमिर खानने तसेच मिश्किलपणे उत्तर दिले आहे. ” रवी तुला माझे फुटवर्क पसंद पडलेले नसल्यामुळे मी थोडा निराश झालो आहे. मला वाटतंय की तु माझा लगान हा चित्रपट पाहिला नाहीयेस. मी ज्या टीममध्ये असेल ती टीम लकी असेल. माझी चांगली शिफारस कर प्लीज,” अशी मिश्किल प्रतिक्रिया आमिर खानने रवी शास्त्रीला उद्देशून केली केली.

हेही वाचा >>> हेल्मेट फेकले, बॅटही आपटली; बाद होताच मॅथ्यू वेड झाला लालबूंद, पाहा व्हिडीओ

दरम्यान, आयपीएलच्या अंतिम सामन्याआधी समापन सोहळा आयोजित केला जाणार आहे. या सोहळ्यात बॉलिवूडचे दिग्गज चेहरे सहभागी होणार आहेत. तसेच नृत्य तसेच अन्य कार्यक्रम सादर करुन हे कलाकार प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहेत.

Story img Loader