एकीकडे आयपीएलचा पंधरावा हंगामा जोमात सुरु असताना दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु फ्रेंचायझीने मोठा निर्णय घेतला आहे. बंगळुरु फ्रेंचायझीने ख्रिस गेल आणि एबी डिव्हिलियर्स या दोन दिग्गज क्रिकेटपटूंचा आपल्या ‘हॉल ऑफ फेम’मध्ये समावेश केला आहे. संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने तशी घेषणा केली आहे.
हेही वाचा >>> दिवसही तोच आणि विरोधी संघही तोच, डेविड वॉर्नरसोबत ९ वर्षांनंतर दुर्दैवी योगायोग; नेमकं काय घडलं?
आयपीएलच्या इतिहासात खेळाडूंना टीमच्या हॉल ऑफ फेममध्ये स्थान देणारा रॉयल चॅलेंजर्स बंगळुर हा पहिलाच संघ ठरला आहे. या संघाने एबी डिव्हिलियर्स आणि ख्रिस गेल या दोघांनाही हा बहुमान दिला आहे. या निर्णयानंतर गेल आणि डिव्हिलियर्स या दोघांनीही आनंद व्यक्त केला आहे. वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल २०११ ते २०१७ अशी सात वर्षे बंगळुरु संघाकडून खेळलेला आहे.
हेही वाचा >>> IPL 2022 : लिव्हिंगस्टोनची गोलंदाजी पाहून वसीम जाफरला का आली गुरमीत राम रहीमची आठवण?
हा बहुमान मिळाल्यानंतर ख्रिस गेलने विशेष प्रतिक्रिया दिली. “हा बहुमान दिल्याबद्दल मी बगंळुरु फ्रेंचायझीचे आभार मानू इच्छितो. माझ्यासाठी हे खूप विशेष आहे. बंगळुरु संघाचे कायम माझ्या हृदयात स्थान असेल,” असे ख्रिस गेल म्हणाला. तसेच माझ्या बंगळुरुच्या संघातील अनेक खेळाडू आणि प्रशिक्षकांसोबत अनेक आठवणी आहेत, असेदेखील गेल म्हणाला.
हेही वाचा >>> ‘महिला टी-२० चॅलेंज’साठी BCCIकडून तीन संघांची घोषणा; मिताली राज, झुलन गोस्वामी बाहेर
तसेच एबी डिव्हिलियर्सनेदेखील बंगळुरु फ्रेंचायझीचे आभार मानले. “या बहुमानाबद्दल आभार मानतो. फॅफ डू प्लेसिस, विराट कोहली तुम्ही सगळेच मला फार वर्षांपासून ओळखता. माझा आयपीएलचा प्रवासदेखील तुम्हाला माहिती आहे. विशेषता बंगळुरु संघासोबतचा माझा प्रवास खास राहिलेला आहे. तुमचे आभार मानण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत,” असे डिव्हिलियर्स म्हणाला.
हेही वाचा >>> Video : जोस बटलर-रियान परागची एकच चर्चा, दोघांनी टिपला अप्रतिम झेल, कृणाल पांड्याला केलं ‘असं’ बाद
यापूर्वी आयपीएलच्या एकाही टीमने कोणत्याही खेळाडूला हॉल ऑफ फेमचा सन्मान दिलेला नाही. मात्र बंगळुरुने हे पाऊल उचलले आहे. दरम्यान, आयपीएलच्या १५ व्या हंगामात बंगळुरु संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानी आहे.