रॉलय चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा स्टार खेळाडू एबी डीव्हिलियर्सने राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यासाठी त्याला मिळालेला सामनावीराचा किताब आपला संघसहकारी मनदीप सिंग या युवा क्रिकेटपटूला देऊ केला आहे. संघाची धावसंख्या डळमळत असताना मनदीप सिंगने सामन्यात एबी डीव्हिलियर्सला सुरेख साथ देत ३४ चेंडुत ५४ धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली होती. डीव्हिलियर्स म्हणाला की, “गेल्या दोन सामन्यांमध्ये माझी कामगिरी निराशाजनक राहिली होती. १८० धावांपर्यंतचे लक्ष्य प्रतिस्पर्धी संघासमोर उभे करू शकू असे एका क्षणाला वाटलेच नव्हते. परंतु, मनदीप ज्याप्रमाणे खेळला त्यामुळे हे शक्य होऊ शकले. खरं तर मनदीपला सामनावीराचा पुरस्कार द्यायला हवा.”
दरम्यान, मनदीप आणि डीव्हिलियर्स यांच्या ११३ धावांच्या भागीदारीमुळेच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला राजस्थान रॉयल्स संघापुढे विजयासाठी १८१ धावांचे आव्हान ठेवता आले होते. डीव्हिलियर्सने ३८ चेंडूत ६६ धावांची खेळी साकारली.

Story img Loader