Abhishek Sharma First IPL Century: सनरायझर्स हैदराबाद संघाचा विस्फोटक फलंदाज अभिषेक शर्माची बॅट अखेरीस आयपीएल २०२५ मध्ये तळपली आहे. अभिषेक शर्माने पंजाब किंग्सविरूद्धच्या संघाच्या सहाव्या सामन्यात वादळी फलंदाजी करत सर्वांनाच मंत्रमुग्ध केलं. त्याने अवघ्या १९ चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं, जे त्याचं यंदाच्या आयपीएलमधील पहिलं शतक होतं. यानंतर त्याने अवघ्या ४० चेंडूत शंभर धावांचा आकडा गाठला.
२४७ च्या मोठ्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना सनरायझर्सच्या सलामी जोडीने संघाला वादळी सुरुवात करून दिली. दोन्ही फलंदाजांनी चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडून सामन्याचे चित्र पालटले. सलग ५ सामन्यात अपयशी ठरलेल्या अभिषेक शर्माने आक्रमक फलंदाजी केली आणि मैदानावर सर्वत्र फटकेबाजी करत सर्वांनाच चकित केलं. ट्रॅव्हिस हेडनेही त्याला चांगली साथ दिली आणि दोन्ही फलंदाजांनी मिळून संघाचा स्कोअर १० षटकांत एकही विकेट न गमावता १४३ धावांपर्यंत पोहोचवला.
यादरम्यान, ७ व्या षटकात अभिषेक शर्माने १९ चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याने ७व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर चौकार मारला आणि आपले अर्धशतक पूर्ण केले. अभिषेकने फक्त ४० चेंडूत शतक पूर्ण केले. त्याच्या खेळीदरम्यान त्याने ११ चौकार आणि ६ षटकार मारले. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट २५० होता. त्याच्यासमोर पंजाबचा कोणताही गोलंदाज काहीही करू शकला नाही. तर यश ठाकूरच्या चौथ्या षटकात अभिषेक शर्मा झेलबाद झाला होता पण तो नो बॉल असल्याने अभिषेकला जीवदान मिळाले आणि अशारितीने त्याने आपले शतक झळकावत संघाच्या विजयाचा पाया रचला.
Abhishek Sharma Mother Father #ipl #ipl2025 pic.twitter.com/Ymz3obpS6M
— Matchday Masterclass (@tourwithdevendr) April 12, 2025