आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील ५४ वा सामना चांगलाच रोमहर्षक ठरला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स संघाच्या गोलंदाजांनी हैदराबादच्या फलंदाजांना चांगलेच बांधून ठेवले. बंगळुरुने पहिल्याच षटकात हैदराबादच्या सलामीवीरांना शून्यावर तंबुत पाठवलं. ग्लेन मॅक्सवेलच्या पहिल्याच षटकात हैदराबादला हे दोन मोठे धक्के बसले.
हेही वाचा >>> दिल्ली कॅपिटल्ससमोर दुहेरी संकट,दिग्गज फलंदाज पृथ्वी शॉ पडला आजारी; केलं रुग्णालयात दाखल
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने नाणेफेक जिंकल्यानंतर सुरुवातीला फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर बंगळुरुने हैदराबादसमोर १९३ धावांचे लक्ष्य ठेवले. या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी हैदराबादचे अभिषेक शर्मा आणि केन विल्यम्सन हे दिग्गज फलंदाज सलामीला आले. मात्र पहिल्याच षटकात या दोन्ही फलंदाजांना तंबुत परतावं लागलं. पहिल्याच षटकाच्या पहिल्या चेंडूवर केन विल्यम्सन धावबाद झाला. शाहबाज अहमदने कोणतीही चूक न करता चेंडू थेट स्टंप्सवर मारल्यामुळे विल्यम्सन शून्यावर तंबुत परतला. तर यात षटकात पाचव्या चेंडूवर अभिषेक शर्मादेखील त्रिफळाचित झाला.
हेही वाचा >>> पुन्हा भोपळा! विराट कोहली शून्यावर बाद, गोल्डन डकवर आऊट होण्याची तिसरी वेळ
ग्लेन मॅक्सवेलने टाकलेल्या पहिल्याच षटकात सलामीचे दोन्ही दिग्गज फलंदाज बाद झाल्यामुळे हैदराबाद संघ चांगलाच अडचणीतच आला. त्यानंतर २१ धावांवर असताना विनंदू हसरंगाने ऐडन मर्कराम याला झेलबाद केलं. विराट कोहलीने त्याचा झेल टिपाल. तर बंगळुरु संघाकडून कर्णदार फॅफ डू प्लेसिसने नाबाद अर्धशतकी खेळी केली. त्याने ५० चेंडूंमध्ये ७३ धावा केल्या. तर दिनेश कार्तिकनेदेखील फक्त आठ चेंडूंमध्ये ३० धावा केल्या.