Abhishek Sharma smashed Virat Kohli’s record : अभिषेक शर्माच्या स्फोटक खेळीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने पंजाब किंग्जचा ४ गडी राखून पराभव केला. पंजाबने प्रथम फलंदाजी करताना २१४ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात सनरायझर्स हैदराबादने १९.१ षटकांत लक्ष्य गाठले. हैदराबादसाठी अभिषेकने विक्रमी खेळी खेळली. हैदराबादसाठी एका मोसमात सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत त्याने हेनरिक क्लासेनला मागे टाकले आहे. त्याचबरोबर अभिषेकने विराट कोहलीचा मोठा विक्रम मोडत इतिहास रचला आहे, जो आठ वर्षांपासून अबाधित होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अभिषेक शर्माच्या कामगिरीबद्दल बोलायचे, तर त्याने २३५.७१ च्या स्ट्राईक रेटने २८ चेंडूत ६६ धावांची शानदार खेळी साकारली. यादरम्यान त्याच्या बॅटमधून ५ चौकार आणि ६ षटकार आले. आयपीएल २०२४ मध्ये अभिषेकने ४१ षटकार मारले आहेत. यासह तो आयपीएलच्या एकाच मोसमात सर्वाधिक षटकार मारणारा भारतीय फलंदाज बनला आहे. या बाबतीत त्याने विराट कोहलीला मागे टाकले आहे.

अभिषेक शर्माने मोडला विराटचा विक्रम –

विराट कोहलीने आयपीएल २०१६ मध्ये ३८ षटकार मारले होते. याशिवाय ऋषभ पंतने आयपीएल २०१८ मध्ये ३७, विराट कोहलीने आयपीएल २०२४ मध्ये ३७ आणि शिवम दुबेने आयपीएल २०२३ मध्ये ३५ षटकार मारले होते. आयपीएल २०२४ मधील युवा अभिषेक शर्माच्या कामगिरीबद्दल बोलायचे तर, त्याने १३ सामन्यांच्या १३ डावांमध्ये ३८.९१ च्या सरासरीने आणि २०९.४१ च्या स्ट्राइक रेटने ४६७ धावा केल्या आहेत. चालू मोसमात त्याने ४१ षटकारांसह ३५ चौकारही मारले आहेत. अभिषेक शर्माने १७ व्या मोसमात ३ अर्धशतके झळकावली आहेत. यामध्ये नाबाद ७५ धावा ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.

हेही वाचा – SRH vs PBKS : हैदराबादचा ४ विकेट्सनी दणदणीत विजय, पंजाबच्या पराभवाने राजस्थानची वाढली डोकेदुखी

हैदराबदसाठी एका हंगामात सर्वाधिक षटकार ठोकणारे खेळाडू –

अभिषेक शर्मा हैदराबादसाठी एका हंगामात सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू ठरला आहे. त्याने आयपीएल २०२४ मध्ये ४१ षटकार मारले आहेत. त्याने हेन्रिक क्लासेनला मागे टाकले. आता क्लासेन दुसऱ्या क्रमांकावर आहे. या मोसमात त्याने ३३ षटकार मारले आहेत. डेव्हिड वॉर्नर आणि ट्रॅव्हिस हेड संयुक्तपणे तिसऱ्या स्थानावर आहेत. हेडने २०२४ मध्ये ३१ षटकार मारले आहेत. वॉर्नरने २०१६ मध्ये ३१ षटकार मारले होते.

हेही वाचा – IPL 2024 : महिनाभर पराभवाच्या गर्तेत अडकलेल्या RCB चा ‘विजयी’ षटकार, ‘या’ ५ खेळाडूंनी पालटले नशीब

टॉप-२ मध्ये पोहोचण्यासाठी हैदराबाद आणि राजस्थानमध्ये स्पर्धा –

सामन्याबद्दल बोलायचे तर, सनरायझर्स हैदराबादने पंजाब किंग्जचा चार विकेट्सनी पराभव केला आहे. आज आयपीएल २०२४ चा शेवटचा डबल हेडर आहे. यानंतर मंगळवारपासून प्लेऑफला सुरुवात होईल. दुसऱ्या स्थानासाठीच्या लढाईत सनरायझर्सने आपला सामना जिंकला आहे. आता त्यांना राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील आजच्या दुसऱ्या सामन्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. जर कोलकाता संघ हरला किंवा हा सामना पावसाने वाहून गेला, तर सनरायझर्स संघ साखळी फेरीत दुसरे स्थान मिळवून प्लेऑफसाठी पात्र ठरेल. त्याचवेळी राजस्थानचा संघ कोलकात्याला पराभूत करण्यात यशस्वी ठरला तर कोलकाता पहिला आणि राजस्थान दुसऱ्या क्रमांकावर राहून प्लेऑफमध्ये पोहोचेल.