Abhishek Sharma Statement on SRH win and Century: अभिषेक शर्माने आपल्या विस्फोटक खेळीसह आयपीएलच्या इतिहासात आपलं नाव सोनेरी अक्षरांनी लिहिलं आहे. अभिषेक शर्माने हैदराबादसाठी २४६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना एकट्याने १४१ धावांची धावसंख्या उभारली अन् संघाच्या विजयाचा हिरो ठरला. सलामीला उतरलेल्या अभिषेक शर्माने वादळी फलंदाजी करत आयपीएलमध्ये एक कमालीची खेळी केली आहे.
अभिषेक शर्माने १९ चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं, तर अवघ्या ४० चेंडूत त्याने आपलं शतक झळकावत संपूर्ण हैदराबाद संघाच्या चाहत्यांसाठी सेलिब्रेशनचा क्षण दिला. अभिषेक शर्माने ५५ चेंडूत १४ चौकार आणि १० षटकारांसह १४१ धावांची तुफान खेळी केली. आयपीएलच्या इतिहासात सर्वात जलद शतक करणारा अभिषेक सहावा फलंदाज ठरला. तर आयपीएल इतिहासात सर्वात मोठी धावसंख्या उभारणारा पहिला फलंदाज ठरला.
अभिषेक शर्माला त्याच्या या मॅचविनिंग खेळीसाठी सामनावीराचा पुरस्कार मिळाला. अभिषेक शर्माचं हे पहिलं आयपीएल शतक खूपचं खास ठरलं कारण त्याची ही खेळी पाहण्यासाठी त्याचे आई-वडिलही मैदानात उपस्थित होते. अभिषेकची आई तर संघाची जर्सी घालून बसली होती. अभिषेक शर्माने पाच सामन्यात अपयशी ठरल्यानंतर ही शतकी खेळी करत आपला फॉर्म परत मिळवला.
अभिषेक शर्मा पहिल्या आयपीएल शतकानंतर काय म्हणाला?
अभिषेक शर्माने सामनावीराचा पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोलताना म्हणाला, “कोणत्याही खेळाडूसाठी अशा फॉर्ममधून जाणं कधीच सोपं नसत. पण संघ आणि कर्णधाराचा विशेष उल्लेख करेन, मी फॉर्ममध्ये नव्हतो तरी त्यांनी सांभाळून घेतलं. मी ट्रॅव्हिस हेडशीही बोललो आमच्यासाठी हा खास दिवस ठरला. मी विकेटच्या मागे कधीच फटके खेळत नाही, पण मी काही फटके खेळण्याचा प्रयत्न केला, कारण या मैदानाचा आकार आणि खेळपट्टीवर बाऊन्स पाहता मला नवे शॉट शोधावे लागले.”
अभिषेक शर्मा त्याच्या आई-व़डिलांविषयी विचारताच बोलताना म्हणाला, “संपूर्ण संघ माझ्या आईवडिलांची आतुरतेने वाट पाहत होते. कारण ते दोघेही आमच्या संघासाठी आणि ऑरेंज आर्मीसाठी लकी राहिले आहेत.”
ट्रॅव्हिस हेडबरोबर सामन्यादरम्यान काय चर्चा केली याबद्दल बोलताना बोलताना अभिषेक शर्मा म्हणाला, “आम्ही दोघं एकमेकांशी काहीच बोललो नाही. आम्हाला फक्त आम्ही जसे खेळत आलो आहोत तसं खेळायचं होतं. ही खेळी हा विजय खूप खास आहे, कारण मला काही करून पराभवांची ही मालिका संपवायची होती. एक युवा खेळाडू म्हणून ही गोष्ट अवघड होती, पण संघामधील वातावरण खूप कमाल होतं.”
Second highest successful run-chase in the #TATAIPL ✅
— IndianPremierLeague (@IPL) April 12, 2025
Runs galore, records broken and Hyderabad rises to a run-chase that will be remembered for the ages ?
Take a bow, @SunRisers ??
Scorecard ▶ https://t.co/RTe7RlXDRq#SRHvPBKS pic.twitter.com/g60LVXPFpo
अभिषेक शर्माने शतकानंतर कोणाचे मानले आभार?
अभिषेकने शेवटी दोन भारतीय खेळाडूंचं आभार मानले, “अभिषेक म्हणाला, सर्वात खास उल्लेख करायचा तर युवी पाजी (युवराज सिंग) मी सतत त्यांच्याशी बोलत होतो, चर्चा करत होतो आणि सूर्यकुमार यादव त्याचेही खूप आभार. मी त्याच्याशी सातत्याने चर्चा करत होतो आणि तो प्रत्येक वेळेस मला मदत करण्यासाठी तो हजर होता.” अभिषेक शर्माने शतकी खेळीनंतर केलेल्या त्याच्या सेलिब्रेशनने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे, त्या प्रसंगाचा व्हीडिओ पाहा एका क्लिकवर…