Shane Watson’s reaction to Rohit Sharma’s form: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सला आयपीएल २०२३ मध्ये चांगली कामगिरी करता आली नाही. संघाने ७ सामने खेळताना केवळ ३ जिंकले आहेत, तर ४ सामन्यांत संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. गेल्या मोसमातही खराब कामगिरीमुळे मुंबईला प्ले ऑफमध्ये पोहोचता आले नव्हते. आता ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू शेन वॉटसनने कर्णधार रोहितच्या फॉर्मवर प्रतिक्रिया दिली आहे. वॉटसनच्या मते, गेल्या ४-५ वर्षांत रोहितमध्ये सातत्य राहिलेले नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शेन वॉटसनने रोहितच्या जास्त सामने खेळवल्याबद्दल प्रतिक्रिया दिली. ‘इंडिया टुडे’च्या वृत्तानुसार, तो म्हणाला, “स्वतःला मानसिकरित्या हाताळणे खूप कठीण असते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू भरपूर क्रिकेट खेळतात, पण भारतीय क्रिकेटपटू वर्षभर न थांबता क्रिकेट खेळतात. रोहित टीम इंडियाचा कर्णधार आहे. म्हणूनच तो अजूनच जास्त खेळतोय. रोहित थकलेला दिसत असेल तर त्याचे कारण स्पष्टपणे कळते.”

शेन वॉटसन पुढे म्हणाला, “आयपीएलच्या गेल्या ४-५ हंगामात रोहितच्या फॉर्ममध्ये सातत्य दिसलेले नाही. तो एक स्फोटक फलंदाज आहे. तो जगातील सर्वोत्तम गोलंदाजांविरुद्ध अनेक परिस्थितीत खेळला आहे. यासाठी खूप मेहनत करावी लागते.”

हेही वाचा – IPL 2023: केकेआर संघाला मोठा धक्का! आयपीएलच्या १६व्या हंगामातून ‘या’ खेळाडूने घेतली माघार

मागील दोन हंगामातील रोहित शर्माची कामगिरी –

विशेष म्हणजे रोहित शर्माने या मोसमात आतापर्यंत ७ सामने खेळले असून या कालावधीत त्याने १८१ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये रोहितने केवळ एक अर्धशतक झळकावले आहे. त्याची सर्वोत्तम धावसंख्या ६५ आहे. २०२३ च्या हंगामात रोहितला एकही अर्धशतक झळकावता आले नव्हते. त्याने १४ सामन्यात २६८ धावा केल्या होत्या. त्याची सर्वोत्तम धावसंख्या ४८ होती. रोहितने २०२१ च्या आयपीएलमध्ये केवळ एक अर्धशतक झळकावले होते. त्याने १३ सामन्यात ३८१ धावा केल्या होत्या.

अननुभवी गोलंदाजी हे मुंबईसाठी मोठे आव्हान बनले –

आयपीएल २०२३ मध्ये, मुंबई इंडियन्सने ७ सामने खेळले आहेत आणि फक्त ३ जिंकले आहेत. मुंबई गेल्या मोसमातही खराब कामगिरीमुळे प्लेऑफमध्ये पोहोचू शकली नव्हती आणि गुणतालिकेतही तळाला होती. यावर्षी खेळाडूंच्या दुखापतींमुळे मुंबई इंडियन्सवरही दबाव आहे. आता येत्या ७ सामन्यात मुंबई चांगली कामगिरी करू शकते की नाही हे पाहावे लागेल. जसप्रीत बुमराह संपूर्ण हंगामासाठी बाहेर आहे आणि जोफ्रा आर्चरच्या फिटनेसवरही प्रश्नचिन्ह आहे. अननुभवी गोलंदाजी हे मुंबईसाठी मोठे आव्हान बनले आहे.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: According to shane watson rohit sharmas performance has not been consistent in the last 4 and 5 years vbm