Sunil Gavaskar comments on Jofra Archer: मुंबई इंडियन्ससाठी आयपीएल २०२३ चा हंगाम सुरुवातीच्या काही सामन्यात चागंला राहिला नाही. त्यानंतर मुंबई संघाने जोरदार मुसंडी मारली आहे. त्याचबरोबर या संघालने प्लेऑफमध्ये स्थान निश्चित केले आहे. मुंबई आणि लखनऊ संघात २४ मे रोजी एलिमिनेटर सामना खेळेला जाणार आहे. इथपर्यंत पोहोचण्यापूर्वी संघाला आपल्या खेळाडूंच्या दुखापतींचा बराच फटका बसला आहे. त्यापैकी एक प्रमुख म्हणजे जोफ्रा आर्चर आपल्या कोपराच्या दुखापतीमुळे स्पर्धा अर्धवट सोडून मायदेश परतला आहे. यावर आता भारताचे माजी खेळाडू सुनील गावसकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

इंग्लंड आणि मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने आयपीएल २०२३ मध्येच सोडून गेल्यानंतर सुनील गावसकर भडकले आहेत. गावसकर यांच्या मते, फ्रँचायझीने आर्चरसाठी एक पैसाही देऊ नये. आयपीएल २०२२ च्या आधी झालेल्या मेगा लिलावात मुंबईने त्याला ८ कोटी रुपयांना विकत घेतले. तो आयपीएल २०२२ मध्ये खेळला नव्हता. आयपीएल २०२३ मध्येही त्याने काही सामने खेळले आणि सीझनच्या मध्यभागी तो इंग्लंडला परतला आहे.

Karun Nair Smashed 88 Runs Against Maharashtra in Semi Final Vijay Hazare Trophy Innings
Karun Nair: करूण नायरचं विजय हजारे ट्रॉफीमधील वादळ कायम, सेमीफायनलमध्ये महाराष्ट्राच्या गोलंदाजांना दिवसा दाखवले तारे
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Kapil Dev Statement on Rohit Sharma Virat Kohli Test Retirement Said They know when to call time
Kapil Dev On Rohit-Virat: “ते दोघं मोठे खेळाडू, त्यांना वाटेल तेव्हा…”, कपिल देव यांचं रोहित-विराटच्या निवृत्तीबाबत मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?
Anil Deshmukh criticized BJP and amit shah
अमित शहां यांना अनिल देशमुखांचे चोख उत्तर म्हणाले,”शिवसेना, राष्ट्रवादी फोडणारा भाजपच दगाबाज “
Virat Kohli Didnt Liked Ambati Rayudu Robin Uthappa Reveals 2019 World Cup Team Selection
Robin Uthappa on Virat Kohli: “विराटला तो आवडत नव्हता”, स्फोटक फलंदाजाला २०१९ च्या वर्ल्डकप संघातून वगळण्याबाबत रॉबिन उथप्पाचा मोठा खुलासा
devendra fadnavis sanjay raut
“संजय राऊत रिकामटेकडे…मी नाही”, देवेंद्र फडणवीसांचा टोला
Farmers warned they wont hand over land for Borvihir Nardana railway without proper compensation
योग्य मोबदला न मिळाल्यास रेल्वेमार्गासाठी जमीन न देण्याचा इशारा
Sunil Gavaskar opinion on Bumrah being a contender for the captaincy sport news
कर्णधारपदासाठी बुमराच दावेदार! नेतृत्वाच्या जबाबदारीचे दडपण घेत नसल्याचे गावस्कर यांचे मत

सुनील गावसकर यांनी मिड डे मधील एका स्तंभात लिहिले, “जोफ्रा आर्चरचा मुंबई इंडियन्सचा अनुभव कसा आहे? तो दुखापतग्रस्त असून या मोसमात तो उपलब्ध होणार हे जाणून त्यांनी धोका पत्करला. त्यांनी त्यासाठी मोठी रक्कम दिली आणि त्या बदल्यात त्यांनी काय दिले? तो १०० टक्के तंदुरुस्त दिसत नव्हता. त्यामुळे त्याने फ्रेंचायझीला याबद्दल माहिती द्यायला हवी होती.”

हेही वाचा – SRH vs RCB: “आज कोहलीने १०० धावा करून इतके नाटक केले, जसे…”, विराटच्या शतकानंतरच्या सेलिब्रेशनवर केआरकेची टीका

यूकेला परत जाणे निवडले –

सुनील गावस्कर पुढे म्हणाले, “तो स्पर्धेच्या मध्यावर उपचारासाठी परदेशात गेला होता, असे त्याच्या देशाच्या क्रिकेट बोर्डाने सांगितले होते. त्यामुळे तो कधीच पूर्णपणे तंदुरुस्त नव्हता, पण तरीही आला. जर तो फ्रँचायझीसाठी वचनबद्ध असेल, जे कदाचित त्याला ईसीबीपेक्षा जास्त पैसे देते, तर तो खेळला नसला तरीही त्याने शेवटपर्यंत टिकून राहायला हवे होते. फ्रँचायझीशी आपली बांधिलकी दाखवण्याऐवजी त्याने यूकेला परत जाणे पसंत केले.”

मुंबई इंडियन्स शर्यतीत लंगडा घोडा पळवण्याचा मुर्खपणा करणार नाही –

गावसकर यांना आशा आहे की, मुंबई इंडियन्स मूर्ख बनणार नाही आणि संपूर्ण रक्कम जोफ्रा आर्चरच्या बँक खात्यात जमा करणार नाही. गावसकर म्हणाले, “जगातील वेगवेगळ्या लीगमध्ये खेळण्यासाठी तो मुंबई इंडियन्ससोबत कोट्यवधींचा करार करणार असल्याचे समोर आले आहे. हे एक विचलित करणारे आहे. त्यामुळे लंगड्या घोड्याला शर्यतीत धावू देण्याइतपत मुंबई इंडियन्स मूर्ख ठरणार नाही. त्याच्याशिवाय स्पर्धेत त्यांनी चांगले पुनरागमन केले आहे. जर त्याला त्याची संपूर्ण आयपीएल फी मिळाली तर तो नशीबवान असेल.”

हेही वाचा – CSK vs DC: चेन्नईविरुद्धच्या सामन्यापूर्वी दिल्लीचा मोठा निर्णय; शेवटच्या सामन्यात करणार ‘हा’ बदल

आयपीएल फ्रँचायझी किंवा देशासाठी खेळणे यापैकी निवड करणे हे खेळाडूवर अवलंबून –

गावसकर पुढे म्हणाले की, खेळाडू कितीही प्रतिभावान असो, संपूर्ण हंगामात एखादा खेळाडू उपलब्ध नसेल, तर कोणत्याही फ्रँचायझीने एक रुपयाही देऊ नये. गावसकर म्हणाले, “तो कितीही मोठा खेळाडू असला, तरी तो संपूर्ण स्पर्धेसाठी उपलब्ध नसेल तर त्याला पैसे देण्यात काही अर्थ नाही. आयपीएल फ्रँचायझी किंवा त्याच्या देशासाठी खेळणे निवडणे हे खेळाडूवर अवलंबून आहे. जर त्याने आयपीएलऐवजी देश निवडला, तर त्याला पूर्ण गुण मिळतात. परंतु जर त्याने आयपीएल निवडले, तर त्याला त्याच्या वचनबद्धतेची पूर्तता करावी लागेल. त्याने काही तरी कारण देऊन लवकर माघार जाऊ नये. विशेषत: जेव्हा प्लेऑफसाठी पात्र होणे महत्त्वाचे असते तेव्हा हे आवश्यक असते.”

एलिमिनेटर सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी धमाल केली –

मुंबई आणि लखनऊचा संघ २४ मे ला चेन्नईत एलिमिनेटर सामना खेळणार आहे. या सामन्यात जो संघ जिंकेल, तो क्वालिफायर २ मध्ये प्रवेश करेल आणि पराभव झालेल्या संघाचा आयपीएलचा प्रवास संपेल. या हाय वोल्टेज सामन्याआधी मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी धमाल केली. रोहित शर्माने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत रोहित, सूर्यकुमार यादव, नेहल वढेरासह अन्य खेळाडू एक सोशल मीडिया ट्रेंडला फॉलो करत होते. या ट्रेंडमध्ये हे खेळाडू ‘सइयां’ गाण्याचे बोल गाण्याचा प्रयत्न करतात.

Story img Loader