Actor Sonu Sood’s post about Indian cricketers : आयपीएल २०२४ च्या हंगामाला सुरुवात होण्यापूर्वीपासून ते आतापर्यंत तीन अशी नावे आहे, जी प्रचंड चर्चेत आहेत. यामध्ये हार्दिक पंड्या, रोहित शर्मा आणि मुंबई इंडियन्स या तीन नावाचा समावेश आहे. आयपीएलच्या सतराव्या हंगामाला सुरुवात होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सने हार्दिक पंड्याला गुजरात टायटन्सकडून ट्रेड विंडोच्या माध्यमातून खरेदी केले आणि आपल्या संघात सामील केले. यानंतर मुंबई इंडियन्स रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवून संघाची धुरा हार्दिक पंड्याच्या खांद्यावर सोपवली. तेव्हापासून हार्दिक पंड्या आणि मुंबई इंडियन्सला आजपर्यंत चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. तसेच हार्दिकला सामना दर सामना मुंबई इंडियन्सचे नेतृत्त्व करणे कठीण होत चालले असताना, अभिनेता सोनू सूदची एक पोस्ट सध्या चर्चेत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोरोना काळापासून अभिनेता सोनू सूदचं फॉलोइंग प्रचंड वाढल आहे. कारण या महामारीच्या काळात तो अनेक गरजवंताना मदत करण्यासाठी पुढे आला होता. त्याने महामारीच्या काळात आपल्या स्वत:च्या पैशातून अनेकांना मदत केली होती. आता त्याने आयपीएलमध्ये चाहत्यांनी हार्दिक पंड्याच्या नेतृत्वावरुन घातलेल्या गोंधळावर कोणत्याही खेळाडूचे नाव न घेता आपले मते मांडले आहे.

अभिनेता सोनू सूदची पोस्ट चर्चेत –

आयपीएल २०२४ मध्ये सुरु असलेल्या गोंधळावर शुक्रवारी अभिनेता सोनू सूदने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले मत मांडले. सोनू सूदने एक्सवर एक पोस्ट शेअर करताना लिहले, “आपण आपल्या खेळाडूंचा आदर केला पाहिजे. ज्या खेळाडूंनी आपल्या देशाच अभिमान वाढवला, ज्या खेळाडूंनी आपल्या देशाचा गौरव केला. एके दिवशी तुम्ही त्यांचा जयजयकार करता, दुसऱ्या दिवशी तुम्ही त्यांच्यावर टीका करता. यामुळे ते नाही तर आपणच अपयशी होतो. मला क्रिकेट आवडते. माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करणारा प्रत्येक क्रिकेटपटू मला आवडतो. तो कोणत्या फ्रेंचायझीसाठी खेळतो हे महत्त्वाचे नाही. तो कर्णधार म्हणून खेळतो किंवा संघातील १५ वा खेळाडू आहे याने काही फरक पडत नाही. ते आपले हिरो आहेत.”

हेही वाचा – IPL 2024 : हैदराबादकडून पराभूत झाल्यानंतर हार्दिक पंड्याने दिली प्रतिक्रिया, सांगितले मुंबईच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण

चाहते प्रत्येक सामन्यात ट्रोल करत असल्याने हार्दिक पंड्याला सामना दर सामना मुंबई इंडियन्सचे नेतृत्त्व करणे कठीण होत चालले आहे. पहिल्या सामन्यात जोरदार खेळी करणाऱ्या हार्दिक पंड्या दुसऱ्या सामन्यात कर्णधार म्हणून पूर्णपणे अपयशी ठरला. सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजांनी स्फोटक खेळी खेळताना हार्दिकला शस्त्र खाली ठेवण्यास भाग पाडले. सनरायझर्स हैदराबादने पहिल्या ११ षटकांत १६० धावांचा टप्पा ओलांडला होता, त्यामुळे हार्दिक पंड्याला त्याच्या माजी कर्णधाराची मदत घ्यावी लागली आणि सामन्याच्या मध्यावर रोहित शर्मा स्वतः क्षेत्ररक्षण सेट करताना दिसला. यादरम्यान त्याने हार्दिकला सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करण्यासाठी पाठवतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor sonu sood made an anonymous post about trolling of hardik pandya in ipl 2024 urging fans to respect cricketers vbm