Karun Nair old tweet is going viral: आयपीएलच्या १६व्या हंगामामध्ये लखनऊ सुपर जायंट्स संघाला मोठा धक्का बसला आहे. लखनऊचा कर्णधार केएल राहुल दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला. मात्र, लिलावात अनसोल्ड राहिलेल्लाय करुण नायरला लखनऊने केएल राहुलच्या जागी संघात स्थान दिले आहे. ही बातमी समोर आल्यानंतर लगेचच करुण नायरचे एक जुने ट्विट व्हायरल होत आहे. करुन नायरने संघात स्थान मिळावे म्हणून एक भावनिक ट्विट केले होते, जे आता व्हायरल होत आहे.

करुण नायर २०१६ मध्ये प्रकाशझोतात आला होता, जेव्हा तो कसोटी क्रिकेटमध्ये तिहेरी शतक झळकावणारा दुसरा भारतीय खेळाडू ठरला होता. भारतासाठी कसोटीत त्रिशतक झळकावणारा नायर हा अनुभवी सलामीवीर वीरेंद्र सेहवागनंतरचा दुसरा फलंदाज आहे. २०१६ मध्ये त्याने कसोटीत त्रिशतक झळकावून बरीच प्रशंसा मिळवली. मात्र, यानंतर नशिबाने नायरला साथ दिली नाही आणि त्याला केवळ राष्ट्रीय संघातीलच नव्हे तर आयपीएलमध्येही आपले स्थान गमवावे लागले. त्यानंतर करुण नायरने एक भावनिक ट्विट केले होते.

Image of Manmohan Singh's sister
Manmohan Singh Death : मनमोहन सिंग यांच्या बहिणीची व्यथा, आजारपणामुळे घेता येणार नाही भावाच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
how many press conference taken by dr manmohan singh
Dr. Manmohan Singh Death: डॉ. मनमोहन सिंग यांनी १० वर्षांत किती पत्रकार परिषदा घेतल्या? पंतप्रधान मोदींशी याची तुलना का केली जाते?
minister dhananjay munde meet cm devendra fadnavis over murder of sarpanch santosh deshmukh
आरोपांनंतर धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : “देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि आकाला..”, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर काय म्हणाले सुरेश धस?
Image Of Dhananjay Munde
Dhananjay Munde : “माझ्याजवळचा असला तरी सोडू नका”, संतोष देशमुख हत्येप्रकरणी धनंजय मुंडेंकडून फाशीची मागणी
Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray
Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणाले, “२०१९ मध्ये मोठी गद्दारी…”
Public Works Minister Shivendra Raje, Satara Shivendra Raje,
साताऱ्यातील आम्ही चारही मंत्री एकत्रितपणे जिल्ह्याचा विकास करू, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजेंचा विश्वास

गेल्या वर्षी आयपीएल लिलावात अनसोल्ड राहिल्यानंतर करुण नायरने एक भावनिक ट्विट केले होते, जे आता व्हायरल होत आहे. या ट्विटमध्ये नायरने लिहिले होते की, “प्रिय क्रिकेट कृपया मला आणखी एक संधी द्या.”

करुण नायरचे हे ट्विट जयदेव उनाडकटच्या पुनरागमनामुळे प्रेरित होते. उनाडकटने मागील वर्षी कसोटी क्रिकेटबाबत असेच ट्विट केले होते. वर्षाच्या अखेरीस उनाडकटला १० वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर कसोटी क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली. बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत उनाडकटला स्थान मिळाल्यानंतर त्याचे जुने ट्विट व्हायरल झाले होते.

हेही वाचा – IPL 2023 GT vs RR: गुजरातविरुद्धच्या पराभवानंतर संजू सॅमसनचे मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘आम्हाला आता अतिरिक्त…’

करुण नायरची आयपीएल कारकीर्द –

करुण नायरबद्दल बोलायचे झाले, तर वयाच्या ३१ व्या वर्षी त्याला पुन्हा क्रिकेटमध्ये स्थान निर्माण करण्याची संधी मिळाली आहे. नायरला आतापर्यंत आयपीएलमध्ये विशेष कामगिरी करता आलेली नाही. नायरने आयपीएलमध्ये ७६ सामने खेळले आहेत आणि 128 च्या स्ट्राइक रेटने आणि २४ च्या सरासरीने १४९६ धावा केल्या आहेत. मात्र, नायरकडे आता स्वत:ला सिद्ध करण्याची मोठी संधी आहे.

Story img Loader