Ajinkya Rahane said he wants to play Test at Wankhede: आयपीएल २०२३ च्या १२ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्सचा त्यांच्या घरच्या मैदानावर वानखेडे स्टेडियमवर सात गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने २० षटकांत ८ गडी गमावून १५७ धावा केल्या होत्या. चेन्नईने १८.१ षटकांत तीन विकेट गमावत १५९ धावा करून सामना जिंकला. या विजयात अजिंक्य रहाणने अर्धशकतक झळकावत महत्त्वाचे योगदान दिले. सामन्यानंतर अजिंक्य रहाणेने आपल्या भावना व्यक्त केल्या.
अजिंक्य रहाणेने २७ चेंडूत ६१ धावांची धडाकेबाज खेळी केली. रहाणेने आपल्या खेळीत सात चौकार आणि तीन षटकार मारले. त्याने अवघ्या १९ चेंडूत आपले अर्धशतक झळकावले, जे या मोसमातील सर्वात जलद अर्धशतक देखील आहे. ३४ वर्षीय रहाणेला सामनावीराचा पुरस्कार मिळाला नाही, पण तो पुन्हा चाहत्यांमध्ये लोकप्रिय झाला. मात्र, मॅचनंतरच्या पोस्ट-मॅच शोमध्ये रहाणेला कसोटी न खेळणे आणि भारतीय संघातून वगळण्यात आल्याने आपल्या भावना व्यक्त केल्या. यासोबतच त्याने या सामन्यात अचानक चेन्नई संघात निवड झाल्याचा किस्साही सांगितला.
टायमिंगवर लक्ष देत आहे –
रहाणे सामन्यानंतर म्हणाला, “या सामन्यात खूप मजा आली. मोईनची तब्येत खराब असल्याचे मला नाणेफेकीपूर्वी कळले. स्टीफन फ्लेमिंगने मला सांगितले की मी हा सामना खेळणार आहे. माझा देशांतर्गत हंगाम चांगला गेला. मी फक्त माझा शेफ राखण्याचा प्रयत्न करतो. टायमिंगवर लक्ष देत आहे.”
रहाणे यंदा बीसीसीआयच्या केंद्रीय करारातून बाहेर –
रहाणे म्हणाला, “आयपीएल ही एक लांबलचक स्पर्धा आहे आणि तुम्हाला कधी संधी मिळेल हे माहीत नाही. वानखेडेवर खेळताना मला नेहमीच मजा येते. मी येथे कधीही कसोटी खेळलो नाही. मला इथे कसोटी खेळायची आहे. माही भाई आणि फ्लेमिंगची खास गोष्ट म्हणजे ते प्रत्येकाला स्वातंत्र्य देतात. माही भाईने मला चांगली तयारी करण्यास सांगितले.” रहाणेलाही बीसीसीआयच्या वार्षिक करारातून वगळण्यात आले आहे. तो आधी ग्रेड-बी मध्ये होता, पण आता तो या करारात नाही. रहाणेने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना जानेवारी २०२२ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी म्हणून खेळला होता.