Rohit Sharma asked Yashasvi Jaiswal where all this strength comes from: राजस्थान रॉयल्सचा (RR) युवा फलंदाज यशस्वी जैस्वालने आयपीएलचा १००० वा सामना आपल्यासाठी संस्मरणीय बनवला. त्याने आयपीएलच्या ऐतिहासिक सामन्यात आपल्या कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. मात्र, सामन्याच्या शेवटच्या षटकात जेसन होल्डर शेवटच्या ६ चेंडूत १७ धावा वाचवू शकला नाही. त्यामुळे यशस्वी जैस्वाली शतकी खेळी व्यर्थ गेली. सामना संपल्यानंतर विरोधी संघाचा कर्णधार रोहित शर्मानेही यशस्वीच्या फलंदाजीचे कौतुक केले. रोहित म्हणाला की त्याची उत्कृष्ट फलंदाजी स्वतःसाठी, भारतीय क्रिकेटसाठी आणि राजस्थान रॉयल्ससाठी चांगली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यशस्वी जैस्वालने मुंबई इंडियन्सच्या जबरदस्त वेगवान आक्रमणासमोर केवळ ६२ चेंडूत १२४ धावा केल्या, ज्यात १६ चौकार आणि ८ षटकारांचा समावेश होता. या खेळीच्या जोरावर जैस्वालने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. यशस्वी जैस्वाल आयपीएलमधील सर्वात मोठी खेळी करणारा अनकॅप्ड खेळाडू ठरला आहे.

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की, यशस्वी यापुढेही असेच यश मिळवत राहील, अशी मला आशा आहे. सामना संपल्यानंतर रोहित शर्मा मॅच प्रेझेंटेशनमध्ये आपल्या टीमच्या खेळाबद्दल बोलायला आला. यावेळी हर्षा भोगले यांनी यशस्वीच्या खेळीबाबत प्रश्न विचारला असता, तो म्हणाला की, “मी त्याला गेल्या वर्षीही पाहिलं होतं, पण या वर्षी त्याने आपला खेळ एका नव्या उंचीवर नेला आहे.”

हेही वाचा – IPL 2023 MI vs RR: १९ मीटर मागे धावत जाऊन संदीप शर्माने घेतला सूर्याचा अप्रतिम झेल; पाहा VIDEO

रोहित शर्मा पुढे म्हणाला, “मी त्याला (यशस्वी) विचारले की, ही सर्व ताकद कुठून येते, त्याने सांगितले की तो जिममध्ये वेळ घालवत आहे, तो खरोखरच चेंडूला सुंदर टाइम करत आहे. हे त्याच्यासाठी, भारतीय क्रिकेटसाठी आणि आरआरसाठी (राजस्थान रॉयल्स) चांगले आहे.”

सामन्याबद्दल बोलायचे तर आयपीएलच्या १००० व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करताना ७ विकेट गमावत २१२ धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबईने १९.३ षटकांत २१४ धावा करत सामना जिंकला. मुंबईसाठी टीम डेव्हिडने २० व्या षटकातील पहिल्या तीन चेंडूत सलग तीन षटकार मारून सामना संपवला. राजस्थानसाठी यशस्वी जैस्वालची १२४ धावांची खेळी व्यर्थ गेली. त्याचवेळी मुंबईकडून सूर्यकुमार यादवने ५५धावा केल्या. त्यांच्याशिवाय टीम डेव्हिडने ४५ आणि कॅमेरून ग्रीनने ४४धावा केल्या.

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After rr vs mumbai match rohit sharma asked yashasvi jaiswal where all this strength comes from vbm
Show comments