RCB head coach Sanjay Bangar on Young Players: आयपीएल २०२३ मध्ये मंगळवारी मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळरु यांच्यात सामना झाला होता. या सामन्यात आरसीबीला पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने १९९ धावा केल्या होत्या, प्रत्युत्तरात मुंबईने हे लक्ष्य १६.३ षटकांत पूर्ण केले. आरसीबीच्या पराभवानंतर त्याच्या गोलंदाजीवर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. पण आरसीबीचे मुख्य प्रशिक्षक संजय बांगर यांच्या मते संघातील युवा अनकॅप्ड भारतीय फलंदाजांनी महत्त्वाच्या संधींचा फायदा घेतला नाही. त्यामुळे त्यांचा संघाने हा सामना गमावला.
या फलंदाजांवर प्रशिक्षक संतापले –
ग्लेन मॅक्सवेलच्या ६८, कर्णधार फाफ डू प्लेसिसच्या ६५ आणि दिनेश कार्तिकच्या १८ चेंडूत ३० धावा वगळता सर्व फलंदाज अपयशी ठरले. महिपाल लोमरर केवळ एक धाव घेत बाद झाला, तर यष्टीरक्षक-फलंदाज अनुज रावतची अपयशाची मालिका कायम राहिली. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आल्यानंतर अवघ्या सहा धावा करून तो बाद झाला.प्रशिक्षक म्हणाले की आम्ही संघ असा बनवला होता की, (ग्लेन) मॅक्सवेल, फॅफ (डु प्लेसिस), विराट (कोहली) आणि दिनेश (कार्तिक) हे फलंदाजीचा कणा बनतील आणि युवा खेळाडू त्यांच्याभोवती खेळतील.
संजय बांगर काय म्हणाले –
सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत बांगर म्हणाले की, त्यांची प्रगती होत आहे, पण फारशी गती नाही. महिपाल लोमररने त्याला मिळलालेल्या संधीचा फायदा घेतला आहे. परंतु अनुज रावत आणि शाहबाज अहमद यांना दुर्दैवाने संधीचा फायदा घेता आला नाही. रिंकू सिंगचे उदाहरण देत भारताचे माजी फलंदाजी प्रशिक्षक बांगर म्हणाले की, युवा फलंदाजांकडून सातत्यपूर्ण कामगिरी करण्यासाठी संघाला संयम बाळगावा लागेल. हाच धडा आहे, तुम्हाला तरुणांसोबत धीर धरावा लागेल. ते त्यांच्या संधीचे सोने करतील आणि संघासाठी सामना जिंकून देणारी कामगिरी करतील, अशी आशा करायला वेळ लागेल.
मुंबईकडून पराभव पत्करावा लागल्याने बंगळुरूने ११ सामन्यांतून १० गुणांसह गुणतालिकेत सातव्या स्थानावर घसरण केली आहे. शेवटच्या दहा षटकांत अतिरिक्त धावा काढण्यासाठी बेंगळुरूला गती न मिळाल्याचे बांगरने खेद व्यक्त केला. ते म्हणाले, हो. आम्हाला दुखावणारे आहे. आम्हाला जिंकायला आणि टेबलमध्ये वर जायला नक्कीच आवडेल. टेबल चुरशीची स्पर्धा आहे. ते म्हणाले की आम्ही निश्चितपणे १० धावांनी मागे राहिलो. मॅक्सवेल, फाफ आणि लोमरोर आऊट झाल्यामुळे आम्ही मधल्या टप्प्यात तीन विकेट गमावल्या. शेवटी आम्हाला त्या अतिरिक्त १० धावा मिळविण्यासाठी आवश्यक गती मिळाली नाही.