Virat Kohli on Rashid Khan: विराट कोहली आणि त्याचा संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे विजेतेपदाचे स्वप्न गुजरात टायटन्सविरुद्धच्या पराभवाने संपुष्टात आले. सामन्यातील पराभवाच्या दु:खात बुडालेला बंगळुरू संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली निराश होऊनही चाहत्यांची काळजी घेत आहे. सामना संपल्यानंतर राशिद खान त्याच्याकडे पोहोचला तेव्हा त्याने विरोधी संघाच्या स्टार लेगस्पिनरचे मोकळ्या मनाने स्वागत केले. विराट कोहलीने विरोधी संघाचा स्टार लेगस्पिनर राशिदला जर्सीवर ऑटोग्राफ दिला.

सामना संपल्यानंतर बंगळुरू आणि गुजरात संघ एकमेकांशी बोलत असताना लेगस्पिनर राशिद खान त्यांच्याकडे आला आणि विराटला त्याचा ऑटोग्राफ मागितला. पराभवाच्या दु:खात बुडलेल्या कोहलीने निराश होऊनही अफगाणिस्तानच्या या फिरकीपटूला निराश केले नाही आणि त्याने जर्सी रशीदला ऑटोग्राफ दिली. यानंतर दोन्ही खेळाडू काही वेळ गप्पा मारतानाही दिसले.

Rajesh Khanna, sanjeev kumar
राजेश खन्नांपेक्षा शत्रुघ्न सिन्हा, संजीव कुमार वाईट होते, असं का म्हणाल्या शबाना आझमी?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Asin husband Rahul Sharma
‘या’ बॉलीवूड अभिनेत्यामुळे जमलं ‘गजनी’ फेम असिनचं लग्न; तिचा पती म्हणाला, “ती खूप…”
PM Narendra Modi special Note for Kareena Kapoor and saif ali khan sons
करीना कपूर-सैफ अली खानच्या मुलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली ‘ही’ खास भेट, अभिनेत्रीने फोटो केला शेअर
Shaheen Shah Afridi becomes youngest bowler to complete 100 wickets in all 3 formats
Shaheen Afridi: शाहीन शाह आफ्रिदीचा मोठा पराक्रम, क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा सर्वात तरूण गोलंदाज
kareena kapoor lal singh chadhha aamir khan
‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाने निराश झाला होता आमिर खान, करीना कपूर खानने केला खुलासा; म्हणाली…
salman khan mother danching with helan
Video : सलमान खानच्या आईने हेलन यांच्याबरोबर धरला ठेका; उपस्थितही पाहतच राहिले, व्हिडीओ होतोय व्हायरल
Marathi Actor Jaywant Wadkar Daughter business
जयवंत वाडकर यांच्या लेकीला पाहिलंत का? झाली नामांकित कंपनीची ब्रँड अँबॅसेडर, मराठी कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव

विराट कोहलीचे आयपीएल विजेतेपदाचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले. आयपीएल २०२३च्या अंतिम साखळी सामन्यात किंग कोहलीच्या संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला गुजरात टायटन्सकडून ६ विकेटने पराभव पत्करावा लागला. कोहलीच्या शतकानंतरही बंगळुरूचा संघ पराभवानंतर आयपीएल २०२३ च्या प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला. या हृदयद्रावक पराभवानंतरही विराटने करोडो चाहत्यांची मने जिंकली.

विराट आयपीएलमध्ये सर्वाधिक शतके करणारा फलंदाज ठरला आहे

या सामन्यात विराटने शानदार शतक झळकावले. त्याने ६१ चेंडूत १३ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद १०१ धावांची खेळी केली. कोहलीचे या मोसमातील हे दुसरे शतक असून आयपीएलमधील विक्रमी सातवे शतक आहे. तो आता या लीगमध्ये सर्वाधिक शतके करणारा फलंदाज बनला आहे. त्याआधी सहा शतके झळकावणाऱ्या ख्रिस गेलचा विक्रम कोहलीने मोडला आहे. कोहलीच्या शतकाच्या जोरावर बंगळुरूने २० षटकांत ५ गडी गमावून १९७ धावा केल्या, जे गुजरातने दोन षटक शिल्लक असताना गाठले.

हेही वाचा: Dhoni Jadeja Controversy: चेन्नई-गुजरात सामन्यापूर्वी एम.एस. धोनी आणि रवींद्र जडेजाच्या नात्यात दुरावा? पत्नी रिवाबाच्या ट्वीटने उडाली खळबळ

शुबमन गिलच्या शतकाने कोहलीचे ‘विराट’ शतक व्यर्थ गेले

गिलच्या शतकाच्या जोरावर गुजरातने हा सामना ६ विकेटने जिंकून बंगळुरूला प्ले ऑफमधून बाहेर काढले. गिलने आपला उत्कृष्ट फॉर्म सुरू ठेवत ५२ चेंडूत ५ चौकार आणि ८ षटकारांसह नाबाद १०४ धावा केल्या. पहिली विकेट लवकर पडल्यानंतर गिल आणि प्रभावशाली खेळाडू विजय शंकर (५३ धावा, ३५ चेंडू) यांनी दुसऱ्या विकेटसाठी १२३ धावांची भागीदारी करत गुजरातला सामन्यात परत आणले. त्यानंतर गिलने शेवटपर्यंत उभे राहून पाच चेंडू राखून संघाला विजय मिळवून दिला. बंगळुरूच्या पराभवामुळे मुंबईला प्लेऑफमध्ये सहज विजय मिळवून दिला.

Story img Loader